BJP Vs NCP Vs NCP SP : शिराळ्याच्या कोकरूडगटात आजी-माजी आमदारांचा लागणार कस? भाजपविरूद्ध दोन राष्ट्रवादी असा रंगणार सामना

Zilla Parishad Election : कोकरूड गटस्थापनेपासून या गटावर दिवंगत शिवाजीराव देशमुख व विद्यमान आमदार सत्यजित देशमुख यांचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे.
Satyajit Deshmukh, Mansingrao Naik, Shivajirao Naik
Satyajit Deshmukh, Mansingrao Naik, Shivajirao Naiksarkarnama
Published on
Updated on

Sangli News : बाजीराव घोडे-पाटील

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिराळा तालुक्यातील प्रतिष्ठेचा मानला जात असलेल्या कोकरूड जिल्हा परिषद गटाला विशेष महत्त्व आहे. कारण गटस्थापनेपासून या गटावर दिवंगत शिवाजीराव देशमुख व विद्यमान आमदार सत्यजित देशमुख यांचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. आजपर्यंत विरोधकांना या ठिकाणी एकदाही विजयाचा गुलाल लागलेला नाही. गत निवडणुकीत कोकरूड जिल्हा परिषद गटात काँग्रेस-राष्ट्रवादी विरोधी भाजप अशी निवडणूक रंगली होती, तर यावेळेस याच्या उलट होणार आहे. काँग्रेसचे गतवेळचे उमेदवार भाजपवासी झाल्याने यंदा दोन राष्ट्रवादी विरोधी भाजप अशी निवडणूक होण्याची शक्यता आहे.

भाजपचे आमदार सत्यजित देशमुख, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार शिवाजीराव नाईक व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार मानसिंगराव नाईक अशी थेट लढत होणार आहे. तेव्हा, ऐनवेळी होणाऱ्या युतीवर पुढील समीकरणे ठरणार आहेत. गत निवडणुकीतील मित्र या वेळी या निवडणुकीत परस्परविरोधी असणार आहेत.

कोकरूड जिल्हा परिषद गटात कोकरूड व कणदूर हे दोन पंचायत समिती गण असून, गतवेळी विद्यमान आमदार सत्यजित देशमुख व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी एकत्रित येत माजी आमदार शिवाजीराव नाईक यांना शह दिला होता. सत्यजित देशमुख व मानसिंगराव नाईक यांनी प्रत्येकी दोन जिल्हा परिषद गट वाटून घेत निर्विवाद वर्चस्व मिळवले होते.

Satyajit Deshmukh, Mansingrao Naik, Shivajirao Naik
BJP Vs NCP : अजितदादांच्या 'NCP'चं भाजपसमोर आव्हान; जगताप-नागवडे आमदार पाचपुतेंना घेरणार

त्यावेळी कोकरूड जिल्हा परिषद गटातून काँग्रेसचे सत्यजित शिवाजीराव देशमुख, पंचायत समिती गणातून अमर विश्वास पाटील व कणदूर पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीच्या मनीषा शिवाजी गुरव विजयी झाल्या होत्या. भाजपकडून जिल्हा परिषदेचे उमेदवार अमर भानुदास माने व पंचायत समितीचे उमेदवार विकासराव लक्ष्मणराव देशमुख, विमल गोरख लोहार यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

काँग्रेसकडून निवडून आलेले सत्यजित देशमुख यांनी काँग्रेसला राम-राम ठोकल्यानंतर त्यांनी सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. त्या रिक्त जागेवर त्यांनी चुलते संपतराव देशमुख यांना संधी देत बिनविरोध निवडून दिले होते. आता मात्र पूर्णपणे तालुक्यातील राजकीय चित्र बदलल्यामुळे या गटातील देखील संपूर्ण चित्र बदलणार आहे.

पूर्वीचे काँग्रेसचे एकनिष्ठ असलेले सत्यजित देशमुख यांनी भाजपचे कमळ, तर भाजपचे शिवाजीराव नाईक यांनी प्रथम राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष व नंतर अजित पवार यांच्या गटात सामील होऊन हातात घड्याळ बांधले आहे. मात्र मानसिंगराव नाईक यांनी शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी अद्याप खाली ठेवलेली नाही. ते शरद पवारांची साथ कायम ठेवत रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे सद्यःस्थितीला या गटातील लढत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच होईल की एकमेकांचे पुन्हा मनोमीलन होईल, यावर जनतेचे लक्ष लागून राहणार आहे.

Satyajit Deshmukh, Mansingrao Naik, Shivajirao Naik
Shivsena-UBT Vs NCP-SP : शरद पवारांच्या जुन्या शिलेदारावर उद्धव सेनेचा डोळा; माजी खासदाराने थेट पक्ष प्रवेशाची ऑफरच दिली

कोकरूड गट व गणातील गावे

कोकरूड गणामध्ये कोकरूड, माळेवाडी, खुजगाव, हत्तेगाव, मोरेवाडी, बिळाशी, खिरवडे, नाठवडे, शेडगेवाडी, कुसाईवाडी, धसवाडी, बेलेवाडी या गावांचा समावेश करण्यात आला आहे. कणदूर गणामध्ये मांगरूळ, पुनवत, उपवळे, पावलेवाडी, शिंदेवाडी, बिउर, रिळे, फुफिरे, शिराळे खुर्द, अस्वलवाडी, बेलेवाडी, कणदूर या गावांचा समावेश करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com