Jayant Patil & ED News: जयंत पाटलांवर भाजपचे जाळे ? 'या' निकटवर्तीयांना 'ईडी'च्या नोटीसा

Sangli NCP News : कार्यकर्त्यांच्या माध्यमांतून कोंडी केल्याने पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष
Jayant Patil
Jayant PatilSarkarnama

Sangli Political News : विरोधी पक्षांच्या नेत्यांना 'ईडी', 'सीबीआय' आणि आयकर विभागाच्या नोटीस पाठवून चौकशीचा ससेमिरा मागे लावून त्यांचा पक्ष प्रवेश करवून घेतला जातो, असा भाजपवर कायम आरोप होत आला आहे. याच चर्चेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतील शरद पवार गटातील मोठ्या नेत्यांना 'ईडी'ची नोटीस मिळाली आहे. यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांसह त्यांचे बंधू भगतसिंह पाटलांचाही समावेश आहे. पुण्यात झालेल्या शरद पवार-अजित पवारांच्या बैठकीला पाटीलही उपस्थित असल्याचे समोर आले आहे. यामुळे जयंत पाटलांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सांगली जिल्ह्यात याबाबत उघड-उघड चर्चा होऊ लागल्या आहेत. (Latest Political News)

Jayant Patil
Sharad Pawar On Mahanor : विधान परिषदेत महानोर बारा वर्ष शेती आणि शेतकऱ्यांच्या विषयावरच बोलले..

राष्ट्रवादी फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा गट सत्तेत सहभागी झाला. जयंत पाटलांनी मात्र शरद पवार यांच्याबरोबर राहण्याची ठोस भूमिका घेतली. गेल्या आठवड्यात पाटलांचे बंधू भगतसिंह पाटलांसह काही निकटवर्तीयांना 'ईडी'च्या नोटीसा आलेल्या आहेत. यात तसेच पुण्यातील झालेल्या बैठकीनंतर जयंत पाटील आता काय करणार, अशी चर्चा वाळवा, शिराळा तालुक्यातील चौकाचौकांत रंगू लागली आहे.

माजी मंत्री असलेल्या जयंत पाटील यांचा वाळवा हा विधानसभा मतदारसंघात वाळव्याबरोबरच शिराळा मतदारसंघातही त्यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत. अजित पवार यांनी बंड केले तर जयंत पाटील शरद पवार यांच्यासोबतच राहणार असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांना होता. जयंत पाटील यांनीही तीच भूमिका घेतली. मात्र गेल्या काही दिवसांपासून पाटील भाजपमध्ये जाणार अशी चर्चा आहे. तर पुण्यात शरद पवार-अजित पवारांत झालेल्या बैठकीला पाटीलही उपस्थित होते. त्यातच पाटलांच्या जवळ असणाऱ्या काही लोकांना 'ईडी'ची नोटीस आली आहे. या सगळ्या घडामोडी पहाता पाटील वेगळी भूमिका घेतील की काय, अशी चर्चा झडू लागली आहे.

Jayant Patil
Ravikant Tupkar Vs Raju Shetti: 'स्वाभिमानी'तही फूट पडणार? रविकांत तुपकरांचे राजू शेट्टींना 10 पानी पत्र

दरम्यान, जयंत पाटलांनी आपण कायम शरद पवारांसोबतच राहणार असल्याच वेळोवेळी स्पष्ट केले आहे. मात्र जवळच्या लोकांना ईडीच्या नोटीस पाठवून भाजपने पाटलांवर जाळे टाकण्यास सुरूवात केली आहे. यातून पाटलांची कोंडी करण्याचा भाजपकडून प्रयत्न सुरू असल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे. यातून पाटलांच्या राजकीय भूमिकेकडे सांगली जिल्ह्यासह राज्याचे लक्ष आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com