Kolhapur News: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्या कार्यपद्धतीवर रविकांत तुपकर यांनी जाहीर नाराजी व्यक्त करीत शिस्तपालन समितीच्या बैठकीकडे पाठ फिरवल्यामुळे 'स्वाभिमानी'ही आता फुटीच्या उंबरठ्यावर तर नाही ना, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. तुपकरांना आपली भूमिका शिस्तपालन समितीसमोर मांडण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंतचा वेळ देण्यात आला होता.
पण तुपकर हे शिस्तपालन समितीसमोर हजर झाले नसून रविकांत तुपकरांनी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींना 10 पानी पत्र पाठवल्याची माहिती आहे. या पत्राच्या माध्यमातून तुपकरांनी आपण का नाराज आहोत, याबाबत सविस्तर म्हणणे मांडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे तुपकरांच्या या पत्रानंतर तरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील वादळ शमणार का, याची उत्सुकता आहे.
रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टी यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर तुपकरांना पक्षाच्या शिस्तपालन समितीने नोटीस देऊन याबाबत खुलासा करण्यास सांगितले होते. याबरोबरच माध्यमांसमोर आपली भूमिका न मांडता शिस्तपालन समितीसमोर आपले म्हणणे मांडावे, असे आवाहनही शेट्टींनी तुपकरांना केले होते.
याबाबत पक्षाच्या शिस्तपालन समितीची बैठकही आयोजित केली होती. पण या बैठकीला तुपकर हजर राहिले नाहीत. त्यानंतर तुपकरांना आपले म्हणणे मांडण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंतचा कालावधी देण्यात आला होता. मात्र, तुपकर हे 15 ऑगस्टपर्यंत शिस्तपालन समितीसमोर हजर राहिले नाही.
त्यावर तुपकर काय उत्तर देणार याची उत्सुकता होती. पण आता तुपकरांनी 10 पानी पत्र शेट्टी यांना मेल केले असून या पत्रात त्यांनी नेमकं काय म्हणणं मांडलं, याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे. या पत्रानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेत काय पडसाद उमटणार याची उत्सुकता आहे.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.