Ajit Pawar NCP : बारामतीत अजितदादांच्या राष्ट्रवादीने गुलाल उधळला; आठ जागांवर बिनविरोध बाजी!

Baramati Nagar Parishad : बारामती नगरपालिका निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली असून आठ नगरसेवक बिनविरोध निवडले गेले आहेत. आणखी काही जागांवर प्रयत्न झाले पण यश आले नाही.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

बारामती नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने आठ नगरसेवक बिनविरोध निवडून आणत सुरुवातीपासूनच आघाडी घेतली.
अजित पवार आणि स्थानिक नेत्यांच्या चर्चेनंतर विरोधकांनी काही ठिकाणी माघार घेऊन बिनविरोध निवडीस मदत केली.
आता नगराध्यक्षपदासाठी 14 आणि नगरसेवकपदासाठी 165 उमेदवार रिंगणात असून राज्याचे लक्ष बारामतीकडे केंद्रीत झाले.

Baramati, 21 November : बारामती नगरपालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बाजी मारली आहे. पक्षाच्या स्थानिक प्रमुख नेत्यांच्या प्रयत्नांमुळे पक्षाचे आठ नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. नेतेमंडळींनी गुरुवारी रात्रीपासूनच बिनविरोधसाठी फिल्डिंग लावली होती. त्यात आठ जागेवर त्यांना यश आले. आणखी चार जागांसाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर बारामतीत (Baramati) नगराध्यक्षपदासाठी 14, तर नगरसेवकपदासाठी 165 अर्ज शिल्लक आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बारामती नगरपरिषदेतील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे.

नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. बारामतीत शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर स्थानिक नेत्यांनी बिनविरोधसाठी विरोधी पक्षातील नेत्यांना विनंती केली. त्यांच्या विनंतीनुसार काही उमेदवारांनी माघार घेतली, त्यामुळे आठ जागा बिनविरोध झाल्या.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे किरण गुजर, सचिन सातव, जय पाटील, अमर धुमाळ यांच्यासह काही प्रमुख कार्यकर्त्यांनी गुरुवारी रात्रीपासूनच बिनविरोध निवडीसाठी जोरदार हालचाली केल्या होत्या. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन आठ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक बिनविरोध निवडून आले. आणखी चार जागांसाठी प्रयत्न झाले. मात्र त्यात त्यांना यश आले नाही.

Ajit Pawar
BJP Victory :भाजपने मंगळवेढ्यात विजयाचे खाते उघडले; आमदार समाधान आवताडेंना बंधूकडून वाढदिवसाचे गिफ्ट

बारामती नगरपालिकेच्या प्रभाग दोन ‘अ’ मधून अनुप्रिता तांबे, पाच ‘अ’ मधून किशोर मासाळ, सहा ‘अ’ मधून धनश्री बांदल, सहा ‘ब’ मधून अभिजित जाधव, आठ ‘अ’ मधून श्वेता नाळे, सतरा ‘ब’मधून शर्मिला ढवाण, अठरा ‘ब’मधून अश्विनी सातव व वीस ब प्रभागातून अफरीन बागवान हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आठ नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत.

दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नगरसेवक पदासाठी दाखल केलेल्या 77 जणांनी, तर नगराध्यक्षपदासाठी दोघांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत. त्यामुळे बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसने 41 जागांपैकी निवडणुकीअगोदरच आठ जागा बिनविरोध निवडून आणत मुसंडी मारल्याचे मानले जात आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बारामतीत नगराध्यक्षपदासाठी 14, तर नगरसेवकपदसाठी 165 जण उमेदवार रिंगणात रालि आहेत. आता प्रत्यक्ष होणाऱ्या निवडणुकीत कोणाचे किती उमेदवार निवडून येणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे.

Ajit Pawar
Shirur Politic's : अशोकबापूंनी शिरूर नगरपालिका टप्प्यात आणली; धारिवाल गटाची मिळाली साथ : अजितदादांच्या आमदारापुढे कडवे चॅलेंज

Q1. राष्ट्रवादी काँग्रेसचे किती नगरसेवक बिनविरोध निवडून आले?
A. आठ नगरसेवक बिनविरोध निवडून आले.

Q2. अजित पवारांनी बिनविरोध निवडीसाठी काय भूमिका घेतली?
A. विरोधी नेत्यांशी चर्चा करून माघारीसाठी प्रयत्न केले.

Q3. आता किती उमेदवार निवडणूक लढवणार आहेत?
A. नगराध्यक्षपदासाठी 14 आणि नगरसेवकपदासाठी 165 उमेदवार शिल्लक आहेत.

Q4. राष्ट्रवादीने बिनविरोध जागा कोणत्या प्रभागांत मिळवल्या?
A. प्रभाग 2A, 5A, 6A, 6B, 8A, 17B, 18B आणि 20B.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com