ZP Election : सोलापूर झेडपीवर भाजपची एकहाती सत्ता येणार; साम टीव्हीचा सर्व्हे

Saam TV survey : सोलापूर जिल्हा परिषद व 11 पंचायत समित्यांसाठी झालेल्या मतदानानंतर सर्व्हेनुसार भाजप 36 जागा जिंकू शकतो. त्यामुळे जिल्हा परिषदेवर भाजपची पहिल्यांदाच एकहाती सत्ता येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Solapur ZP
Solapur ZPSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 07 February : सोलापूर जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील ११ पंचायत समितींसाठी आज (ता. ०७ फेब्रुवारी) चुरशीने मतदान झाले. साम टीव्हीने केलेल्या सर्व्हेमध्ये भारतीय जनता पक्ष सर्वाधिक ३६ जागा जिंकणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे, त्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेवर भाजपची पहिल्यांदाच एकहाती सत्ता येऊन स्वबळावर पक्षाचा अध्यक्ष होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सोलापूर (Solapur) जिल्हा परिषदेच्या ६८ जागा आणि ११ पंचायत समितीच्या १३६ जागांसाठी आज सकाळी सातपासून सायंकाळी साडेपाचपर्यंत मतदान झाले. झेडपी आणि पंचायत समितीसाठी दुपारी साडेतीनपर्यंत ४८ टक्के मतदान झाले होते. आज लग्नाचा मूहूर्त होता, त्यामुळे दुपारीनंतर मतदानाचा वेग वाढला होता. त्यामुळ दुपारनंतर झालेल्या मतदानामुळे यात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांचा साम टीव्हीने (Saam Tv) केलेल्या सर्व्हेमध्ये भाजप सर्वाधिक २६३ जागा जिंकेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यानंतर शिंदेसेना १५६, तर राष्ट्रवादी ११८, ठाकरेसेना ४८, काँग्रेस ६१, राष्ट्रवादी शरद पवार ४२, इतर ३६ तर मनसे सहा जागा जिंकेल, असा अंदाज सामच्या सर्व्हेत वर्तविण्यात आलेला आहे.

Solapur ZP
Dhairyasheel Mohite Patil : धैर्यशील मोहिते पाटील पोलिसांवर भडकले; भाजपचे लोक 100 मीटरच्या आत, हे काय लावलंय?

सोलापूर जिल्हा परिषदेच्या ६८ जागांपैकी तब्बल ३६ जागा जिंकून भाजप एकहाती सत्ता स्थापन करेल, असा अंदाज साम टीव्हीच्या सर्व्हेतून वर्तविण्यात आलेला आहे. अजित पवाररांची राष्ट्रवादी १०, तर शरद पवारांची राष्ट्रवादी ०९ जागा मिळवतील, असेही हा सर्व्हे सांगतो. त्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेवर प्रथमच कमळ स्वबळावर फुलण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Solapur ZP
Vilas Bhumre : शिवसेना आमदाराच्या मुलाचा हट्ट निवडणूक कर्मचाऱ्याच्या मुळावर; बोटाला लावलेली शाई अन् करू दिलेले मतदान अंगलट

साम टीव्हीच्या सर्व्हेतून सोलापूर जिल्ह्यात कोणत्या पक्षाला मिळणाऱ्या संभाव्य जागा पुढीलप्रमाणे

भाजप : ३६

शिंदेसेना : ०७

राष्ट्रवादी अप : १०

राष्ट्रवादी शप : ०९

इतर : ०६

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com