Radhakrishna Vikhe-Patil Sangli BJP Politics
Radhakrishna Vikhe-Patil Sangli BJP Politicssarkarnama

Sangli BJP Politics : भाजपच्या कार्यकर्त्यांनी विखे-पाटलांसमोरच दंड थोपटले? स्थानिकबाबत स्वबळाचा नारा

Radhakrishna Vikhe-Patil : ‘आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांना भाजपचे नेते, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कानमंत्र दिला.
Published on

Sangli News : सर्वोच्च न्यालायालयाच्या आदेशाप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्या पद्धतीने जिल्हा स्तरापासून राज्य पातळीपर्यंत आता बैठका आणि हालचालींना वेग आला आहे. यादरम्यान सांगलीत देखील भाजपचे नेते, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत भाजपची बैठक झाली. यावेळी त्यांच्याकडे भाजपच्या कार्यकर्त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक स्वबळावर लढवण्याची आग्रही मागणी केल्याचे कळत आहे. यामुळे सांगलीत यावरून महायुतीतीत पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

सांगलीत आयोजित बैठकीत भाजपच्या कार्यकर्त्यांना स्वबळाचा नारा दिला आहे. तर शतप्रतिशत भाजप हीच आमचीही भूमिका आहे, मात्र स्वबळावर की महायुती याबाबतचा निर्णय वरिष्ठस्तरावर होईल तो मान्य असेल, असे स्पष्टीकरण विखे-पाटील यांनी दिले आहे.

यावेळी आमदार सुरेश खाडे, गोपीचंद पडळकर, सत्यजित देशमुख, पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, दीपक शिंदे, भगवानराव साळुंखे, पृथ्वीराज देशमुख, दिनकर पाटील, नितीन शिंदे, पृथ्वीराज पवार, शिवाजी डोंगरे, राहुल महाडिक, वैभव पाटील यांच्यासह पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

Radhakrishna Vikhe-Patil Sangli BJP Politics
Radhakrishna Vikhe Patil : नितेश राणेंनंतर विखे पाटलांचे विधान चर्चेत; म्हणाले, कोणताही पक्ष भाजपच्या बरोबरीला...

विखे-पाटील सांगली दौऱ्यावर आले असता भाजपच्या शहर, ग्रामीण कोअर कमिटीची बैठक झाली. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी, भाजपच मोठा भाऊ असल्याने स्वराज्य संस्थांचा निवडणूक योग्य वाटा मिळावा, अन्यथा स्वबळावर निवडणुका लढवण्याची मागणी केली. यावर ‘स्वबळ की महायुती’ याबाबतचा निर्णय वरिष्ठ स्तरावर होईल. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल, मात्र कार्यकर्त्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी कामाला लागावे, असा कानमंत्र विखे-पाटील यांनी दिला आहे.

Radhakrishna Vikhe-Patil Sangli BJP Politics
Radhakrishna Vikhe Patil : सुपा एमआयडीसी साफ केलीय, आता नगरचा नंबर; मंत्री विखे पाटलांच्या टार्गेटवर खंडणीखोर!

यावेळी विखे-पाटील यांनी, आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी एकत्रित प्रयत्न करा. भाजपच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी कामाला लागावे. महापालिका निवडणुकीसाठी प्रभागरचना होणार आहे. त्यावर सुरुवातीपासून लक्ष ठेवा. नंतर त्यात बदल होणार नाही. असे सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com