Kolhapur ZP : महापालिकेची निवडणूक सुरु असतानाच भाजपची गाडी जिल्हा परिषदेच्या गेटवर : इच्छुकांच्या मुलाखतींचे नियोजन जाहीर

Kolhapur District Politics : महापालिका निवडणूक सुरू असतानाच भाजपने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तयारीला वेग दिला असून, इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
BJP leaders preparing for Zilla Parishad elections as the party announces interview schedule for aspirants across Kolhapur district during ongoing municipal polls.
BJP leaders preparing for Zilla Parishad elections as the party announces interview schedule for aspirants across Kolhapur district during ongoing municipal polls.Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Zilla Parishad Election News : महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवार ठरवताना नाकीनऊ आलेल्या नेत्यांना आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या इच्छुकांना सामोरे जावे लागणार आहे. यात भाजपने आघाडी घेतली असून महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरु असतानाच भाजपने जिल्हा परिषद निवडणुकीला इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखतीची तारीख जाहीर केली आहे.

भाजपाचे कार्यालय प्रभारी शिवाजी बुवा यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे मुलाखतीसाठी तारखा आणि ठिकाणं जाहीर केली आहेत..भाजपकडून काढण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटले आहे की, आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुशंगाने भारतीय जनता पक्ष कोल्हापूर (पश्चिम) च्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत.

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूका कधीही जाहीर होऊ शकतात. भाजपाने (BJP) इच्छुक उमेदवारांचे अर्ज जिल्हा कार्यालयाकडे मागfतले होते . त्यानुसार कोल्हापूर पश्चिम जिल्ह्यातुन तब्बल 650 उमेदवारांनी आपणास उमेदवारी मिळावी अशी मागणी केली आहे .

महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार खासदार धनंजय महाडीक, आमदार अमल महाडीक, आमदार शिवाजीराव पाटील, माजी मंत्री भरमु आण्णा पाटील, माजी आमदार संजय बाबा घाटगे, प्रदेश सचिव महेशराव जाधव, जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील या नेत्यांचे पॅनेल इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेतील. मुलाखतीस येताना इच्छूक उमेदवाराने कोणत्याही प्रकारे शक्ती प्रदर्शन न करता स्वतःच मुलाखतीस यावे असे आवाहन करण्यात आले आहे .

मुलाखतीचे वेळापत्रक

  • सोमवार दि. 5 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजले पासून आजरा, गडहिंग्लज, चंदगड .

  • मंगळवार दिनांक 6 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून भुदरगड , राधानगरी , कागल, भुदरगड .

  • बुधवार दि. 7 जानेवारी 2025 सकाळी 11 वाजल्यापासून कोल्हापूर दक्षिण, करवीर, पन्हाळा, गगनबावडा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com