Chitra Wagh On Sanjay Raut: ठाकरेंच्या आसपास नशेबाज असल्यामुळे पक्ष उद्ध्वस्त झाला; चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

BJP : भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांचा राऊतांवर जोरदार निशाणा
Chitra Wagh and Sanjay Raut
Chitra Wagh and Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Pune News: ड्रग्ज प्रकरणावरून शिवसेनेने (ठाकरे गट) शुक्रवारी नाशिकमध्ये संजय राऊत यांच्या नेतृत्वात मोर्चा काढला. त्यापूर्वी मीडियाशी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्र्यांवर ठाकरी भाषेत जहाल टीका केली. त्यानंतर भाजपच्या नेत्या तथा महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी संजय राऊतांना जशास तसे प्रत्युत्तर दिले.

"कदाचित फडणवीसांना भांगेची झिंग येत असावी, अन्यथा सध्या ड्रग्ज प्रकरणावर ते जी विधाने करत आहेत, शिवसेनेवर आरोप करीत आहेत, ते त्यांनी केले नसते", असे संजय राऊत नाशिकमध्ये म्हणाले. राजकीय आणि पोलिसांच्या आश्रयाशिवाय एवढे मोठे ड्रग्ज प्रकरण आरामात व कोणतीही बाधा न येता सुरूच राहिले नसते. त्यात कोट्यवधींची उलाढाल होत होती. त्याला फडणवीसांचा पाठिंबा आहे का ? अशी विचारणाही त्यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Chitra Wagh and Sanjay Raut
Solapur Politics : सुशीलकुमार शिंदेंची लोकसभेसाठी मोर्चेबांधणी; राजन पाटलांची अनगरच्या वाड्यावर जाऊन घेतली भेट

यानंतर चित्रा वाघ यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली. दररोज सकाळी जे काही बरळतात… त्यावरून कळतं की त्यांची नशा कधी उतरतच नाही. त्यामुळेच सर्वज्ञानी राऊतांच्या तोंडून महिलावाचक शिवीगाळ येते. बाळासाहेबांच्या विचारांना सोडून, हिंदुत्वाचा विचार सोडून कॉंग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांनी कुत्ता गोळी घेतली असावी, अशी तोफ चित्रा वाघ यांनी डागली.

कोविड घोटाळ्यातील भ्रष्टाचार, पत्राचाळीतील भ्रष्टाचार हे गुन्हे नशा करूनच केले असावेत, उद्धव ठाकरेंच्या आसपास असे नशेबाज असल्यामुळेच त्यांचा पक्ष उद्ध्वस्त झाला, असा खळबळजनक आरोप चित्रा वाघ यांनी केला. आता भ्रमिष्ट झालेल्या संजय राऊतांना महायुती सरकार करत असलेला महाराष्ट्राचा विकासही दिसेनासा झाला आहे. २०२४ च्या निवडणुकांनंतर राऊतांची भयानक नशा नक्की उतरेल, असा हल्लाबोल चित्रा वाघ यांनी केला.

Edited by Ganesh Thombare

Chitra Wagh and Sanjay Raut
Maratha Reservation : राणेंनी जरांगेंचे मराठा आंदोलन संपविण्याची सुपारी घेतली; शिवसेना नेत्याचा आरोप

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com