Mohol Politics : फडणवीसांचा निकटवर्तीय भाजप नेता बुधवारी पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार

Loksabha Election 2024 : मोहोळ तालुक्यातील जनतेने माझ्यावर गेली 25 वर्षापासून अपार प्रेम केले आहे. पण त्याबदल्यात मी त्यांना काहीही देऊ शकलो नाही. भाजपकडून आजपर्यंत मला कधीच निधी दिला गेला नाही.
Sanjay Kshirsagar
Sanjay KshirsagarSarkarnama

Solapur, 22 April : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे मोहोळचे भाजपचे नेते संजय क्षीरसागर येत्या बुधवारी (ता. २४) शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. याबाबतची माहिती खुद्द संजय क्षीरसागर यांनी दिली. भाजपत गेल्या दहा वर्षांत मला कायम अपमानास्पद वागणूक दिली गेली, त्यामुळे मी पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत आहे, असेही त्यांनी या वेळी नमूद केले.

मोहोळ (Mohol) तालुक्यातील जनतेने माझ्यावर गेली 25 वर्षापासून अपार प्रेम केले आहे. पण त्याबदल्यात मी त्यांना काहीही देऊ शकलो नाही. भाजपकडून (BJP)आजपर्यंत मला कधीच निधी दिला गेला नाही. जनतेच्या या उपकराची उतराई कशी करणार. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटायला मुंबईत गेल्यानंतर आम्हाला तीन तीन दिवस भेट मिळू शकली नाही. शेवटी तीन ते चार दिवस मुंबईत राहून परत मोहोळला यायचो. माझा भाजपवर राग नाही. पण पक्षाच्या ग्रामीण व्यवस्थेवर माझा राग आहे, असेही संजय क्षीरसागर यांनी सांगितले

Sanjay Kshirsagar
Madha Loksabha Election 2024 : रामराजेंच्या भगिनी मोहिते- पाटलांना पाठिंबा देणार; रणजितसिंहांच्या अडचणीत वाढ...

या बाबत वरिष्ठांना अडचण सांगण्याचा अनेकदा प्रयत्न केले. पण, आमची कुणी गांभीर्याने दखल घेतली नाही. मतदारसंघातील 140 गावांचा दौरा केला. त्यात जनतेची मते जाणून घेतली, त्या वेळी त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा सल्ला दिला, असेही संजय क्षीरसागर (Sanjay Kshirsagar ) यांनी स्पष्ट केले.

भाजपच्या कठीण काळात आम्ही पक्षासाठी काम केले. मात्र, जिल्ह्यातील काही नेत्यांच्या दबावामुळे माझ्यावर कायम अन्याय केला गेला आहे. त्यामुळेच मी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मला कसा त्रास दिला गेला, याबाबत मी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे पुरावे दिले आहेत, असा दावाही संजय क्षीरसागर यांनी केला.

Sanjay Kshirsagar
Solapur, Madha Lok Sabha : सोलापुरात 11, तर माढ्यातून सहा उमेदवारांची माघार; ‘वंचित’ची माघार धक्कादायक!

राष्ट्रवादी प्रवेशाबाबत माझी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी चर्चा झाली आहे. आमची एक बैठकही झाली आहे. त्या बैठकीत मोहोळ विधानसभेची जागा कोणला जाणार याबाबत बोलणे झाले, त्यानंतर राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार रोहित पवार, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे, त्या मेळाव्यातच मी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे, असेही क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.

Edited By : Vijay Dudhale

Sanjay Kshirsagar
Solapur 'Vanchit' News : माझ्या हातात बंदूक दिली, पण गोळ्या दिल्या नाहीत; सोलापूरमधील ‘वंचित’च्या उमेदवाराचा गंभीर आरोप

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com