Madha Loksabha Election 2024 : रामराजेंच्या भगिनी मोहिते- पाटलांना पाठिंबा देणार; रणजितसिंहांच्या अडचणीत वाढ...

Ramraje Naik Nimbalkar माढा लोकसभा मतदारसंघात माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण, त्यांनी सुप्त राहणे पसंत केले आहे. नुकतीच त्यांनी साताऱ्यात उदयनराजेंची भेट घेतली होती.
Ranjitsinh Naik Nimbalkar, Ramraje Naik Nimbalkar
Ranjitsinh Naik Nimbalkar, Ramraje Naik Nimbalkarsarkarnama

Madha Loksabha News : माढा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुतारी हाती घेऊन उमेदवारी घेतली आहे. आता सर्वांचे लक्ष फलटणचे नेते रामराजे नाईक निंबाळकर काय भूमिका घेणार याकडे लागली आहे. रामराजेंच्या भगिनी सुभद्राजे नाईक निंबाळकर यांनी धैर्यशील मोहिते पाटलांची भेट घेऊन पाठिंबा देणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

माढा लोकसभा मतदारसंघात माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण, त्यांनी सुप्त राहणे पसंत केले आहे. नुकतीच त्यांनी साताऱ्यात उदयनराजेंची भेट घेतली होती. या हालचाली सुरु असतानाच मात्र, रामराजेंचे बंधू रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी जाहीरपणे तुतारीचे काम करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांची ताकत दिवसेंदिवस वाढत आहे. त्याबरोबरच रामराजे यांच्या भगिनी सुभद्राराजे नाईक निंबाळकर या धैर्यशील मोहिते पाटील यांना भेटून फलटणकरांच्या वतीने पाठिंबा जाहीर करणार आहेत. सुभद्राराजे नाईक निंबाळकर यांच्यासोबत फलटणचे २० ते २५ आजी, माजी नगरसेवक हे धैर्यशील मोहिते पाटील यांना भेटायला जाणार आहेत.

Ranjitsinh Naik Nimbalkar, Ramraje Naik Nimbalkar
Madha Loksabha : माढ्यातून शेकापच्या देशमुखांनी घेतला उमेदवारी अर्ज मागे

मोहिते पाटलांना भेटून पाठिंबा देणार असल्याचे सुभद्राराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, रणजितसिंह मोहिते पाटील भाजपच्या प्रचार यंत्रणेपासून दूर राहिले आहेत. मोहिते पाटील कुटुंबियांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाची तुतारी हाती घेतली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मात्र, रणजितसिंह मोहिते पाटील अजूनही भाजपमध्येच आहेत. ते भाजपकडून विधान परिषदेचे आमदार असले तरी भाजपच्या प्रचार यंत्रणेपासून ते दूर राहिले आहेत. त्यामुळे पुढील काळात रणजितसिंह मोहिते पाटील काय भूमिका घेणार याची उत्सुकता आहे.

Edited By : Umesh Bambare

Ranjitsinh Naik Nimbalkar, Ramraje Naik Nimbalkar
Phaltan NCP News : निवडणुका आल्या की, त्यांना पुतळ्यांची आठवण; संजीवराजेंचा खासदार निंबाळकरांवर पलटवार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com