Satara : सातारा लोकसभेतून भाजपचाच खासदार निवडून येणार.. जयकुमार गोरे

माढा लोकसभा Madha Loksabha मतदारसंघ हा केंद्रीय माजी कृषिमंत्री शरद पवार Sharad Pawar यांचा मतदारसंघ होता. मात्र, तेथे आता भाजपचा BJP MP खासदार निवडून Wins आला आहे.
MLA Jaykumar Gore
MLA Jaykumar Goresarkarnama
Published on
Updated on

सातारा : सातारा जिल्ह राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असला तरी जिल्ह्यात त्यांचे तीनच आमदार उरले आहेत, अशी टीका करून आता परिस्थिती बदलली असून राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत होत नाहीत, असे नाही तर त्यांना निश्चितपणे हरवले जाऊ शकते. त्यासाठी भाजपने रणनिती आखली असून आगामी लोकसभा निवडणुकीत साताऱ्यातून भाजपचाच खासदार निवडून येणार, असा ठाम विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष, आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला.

शासकिय विश्रामगृहात त्यांनी आज केंद्रीय मंत्री सोमप्रकाश यांच्या दौऱ्याची माहिती देण्यासाठी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीवर टीका केली. जयकुमार गोरे म्हणाले, सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, राष्ट्रवादीचे जिल्ह्यात तीनच आमदार उरले आहेत.

MLA Jaykumar Gore
Maan : एमआयडीसीच काय, साधे कसपाटही माणच्या बाहेर जाऊ देणार नाही... जयकुमार गोरे

माढा लोकसभा मतदारसंघ हा केंद्रीय माजी कृषिमंत्री शरद पवार यांचा मतदारसंघ होता. मात्र, तेथे आता भाजपचा खासदार निवडून आला आहे. ता परिस्थिती बदलली आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत होतच नाहीत असे नाही तर निश्चितच त्यांना हरवले जाऊ शकते.

MLA Jaykumar Gore
एमआयडीसी पळवून नेणाऱ्यांचा कट जयकुमार गोरे हाणून पाडणार...

या अनुषंगानेच भाजपने रणनिती आखली असून आगामी लोकसभा निवडणुकीत साताऱ्यातून भाजपचाच खासदार निवडून येणार, अशी ठाम विश्वास आमदार गोरे यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com