एमआयडीसी पळवून नेणाऱ्यांचा कट जयकुमार गोरे हाणून पाडणार...

जयकुमार गोरे Jaykumar Gore म्हणाले, माझ्या मतदारसंघातील पाण्याचा थेंब Water Drop मी कुणाला पळवू दिला नाही. एमआयडीसी MIDC मंजूर करायला आम्ही प्रयत्न केलेत. त्यामुळे पळवापळवीची भाषा कुणी करु नये.
Ranjitsinh nimbalkar, Jaykumar Gore
Ranjitsinh nimbalkar, Jaykumar Goresarkarnama
Published on
Updated on

बिजवडी : माण तालुक्यातली एमआयडीसी पळवून नेण्याचा कट कोण रचत असेल तर त्यांनी सावध राहावे. कारण या मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे आहेत. जो पर्यंत आमदार गोरे आणि मी तुमच्या पाठीशी आहे, तोपर्यंत ही एमआयडीसी कोणीही पळवून नेऊ शकत नाही. त्यामुळे माणवासियांनो निश्चित रहा. आजपर्यंत अनेक राजकीय कट आमदार जयकुमार गोरेंनी हाणून पाडलेत. एमआयडीसी पळवून नेण्याचा कट ही ते हाणून पाडतील, असा विश्वास खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.

माण तालुक्यातील दिवड येथे विविध विकास कामांच्या लोकार्पण आणि माण तालुक्यातील भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या सत्कारप्रसंगी गोंदवले गटाच्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार जयकुमार गोरे, ज्येष्ठ नेते अर्जुन काळे, जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे, सभापती विलासराव देशमुख, रंजना जगदाळे, सरपंच जाकीर सय्यद, उपसरपंच किरण सावंत, डॉ. मासाळ, अकिल काझी, विष्णूपंत कट्टे, गुलाबराव कट्टे, दिगंबर राजगे, वसंत भोसले, महादेव सावंत, रामचंद्र सावंत, विजय कुलकर्णी, आनंदराव वाघमोडे आदी उपस्थित होते.

Ranjitsinh nimbalkar, Jaykumar Gore
राष्ट्रवादी हा भांडण लावणारा पक्ष; माणमध्ये फक्त जयकुमार गोरेंचेच सरकार...

खासदार निंबाळकर म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माण-खटावचे भुमिपूत्र आमदार जयकुमार गोरेंची पाणीप्रश्न आणि भागाच्या विकासाबातची तळमळ तन्मयतेने ऐकूण घेत त्यांनी खटावला येण्याचे निमंत्रण स्वीकारले आहे. इथल्या रेल्वे सर्वेक्षणासाठीही आम्ही प्रयत्न करतोय. जयकुमार गोरे म्हणाले, माझ्या मतदारसंघातील पाण्याचा थेंब मी कुणाला पळवू दिला नाही. एमआयडीसी मंजूर करायला आम्ही प्रयत्न केलेत. त्यामुळे पळवापळवीची भाषा कुणी करु नये. मतदारसंघात रेल्वे आणायचही आमचा प्रयत्न सुरु आहे.

Ranjitsinh nimbalkar, Jaykumar Gore
रणजितसिंह निंबाळकरांचे प्रयत्न; माण, खटावच्या १८१ गावात मिळणार नळाद्वारे पाणी...

मला पाणी आणायची, विकासकामे करायची मस्ती आहे. आता विरोधकांची पोकळ मस्ती उतरविण्याचा अजेंडा राबविणार आहे. पाण्याच्या टॅंकरची मागणी करणारी जनता आता ऊस तोडीसाठी टोळी मागताना दिसत आहे. हा बदल मी केलेल्या कामांची पोचपावती आहे. उरमोडीचे पाणी शेताच्या बांधापर्यंत देण्यासाठी १४३ कोटींची कामे सुरु आहेत.

Ranjitsinh nimbalkar, Jaykumar Gore
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला आमदार जयकुमार गोरेंना हा शब्द...

जिहे कठापूरचे पाणी आणून पुन्हा एकदा फेटा बांधायची वेळ जवळ आली आहे. वाळूवाल्यांनी जरा सबूरीने घ्यावे अन्यथा, त्यांच्याकडेही बघावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. राष्ट्रवादीतील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ॲड. हांगे, सदाशिव सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. सयाजी लोखंडे यांनी प्रास्ताविक केले.

Ranjitsinh nimbalkar, Jaykumar Gore
माण बाजार समितीवर आमदार जयकुमार गोरे यांचे एकहाती वर्चस्व      

माझ्याकडे जनतेचे मिसाईल

बारामती, फलटण, कराड, साताऱ्यातून माझ्यावर मिसाईलचा मारा राष्ट्रवादीकडून केला जातोय. पण, माझ्याकडे त्यांच्या सगळ्या मिसाईलला पुरुन उरणारे माझ्यावर विश्वास असणाऱ्या जनतेचे हुकमी मिसाईल आहे. माणच्या गोरेंनी मला माढ्यातून घालवून देशात माझी अब्रू घालवली. काहीही करुन सगळे एकत्र या आणि त्यांना पाडा असा आदेश पवारांनी सिल्व्हर ओकवर झालेल्या बैठकीत दिला होता.

Ranjitsinh nimbalkar, Jaykumar Gore
दोन्ही राजे आमचेच...सातारा पालिकेचा निर्णय फडणवीस घेतील...

मतदारसंघातील २२ नेते कोट्यवधींना विकत घेण्यात आले होते. पवारांचा आदेश आणि मिळालेले पैसे घेऊन सगळी फौज माझ्या विरोधात लढली. पैशांचा पूर आणि जातीपातीचे राजकरण केले. पण, जयकुमारने त्यांना हिसका दाखवला. मला पाडायची त्यांना तेव्हाच संधी होती. ती हुकल्याने आता पुढील १५ वर्षे त्यांनी आमदारकीची स्वप्नेच बघू नयेत असा टोला आमदार जयकुमार गोरेंनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com