Mohite Patil : मोहिते पाटलांना धक्का : भाजपच्या गोटात गेलेल्या नगरसेवकाच्या गळ्यात श्रीपूर-म्हाळुंगच्या उपनगराध्यक्षपदाची माळ

Shripur-Mahalung Nagar Panchayat : श्रीपूर-म्हाळुंग नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहिते पाटील गटाला धक्का बसला. भाजपमध्ये प्रवेश केलेले तानाजी नवनाथ भगत यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली असून राजकीय समीकरणे बदलली आहेत.
Deputy President of Shripur-Mahalung Nagar Panchayat
Deputy President of Shripur-Mahalung Nagar PanchayatSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 13 September : अवघ्या काही महिन्यांवर निवडणूक आलेल्या श्रीपूर-म्हाळुंग नगरपंचायतीच्या राजकारणात मोहिते पाटील यांना धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी मोहिते पाटील गटाची साथ सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले तानाजी नवनाथ भगत यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध झाली आहे.

उपनगराध्यक्ष भगत यांच्यासह आतापर्यंत चार नगरसेवकांनी मोहिते पाटील यांची साथ सोडल्याने श्रीपूर-म्हाळुंग नगरपंचायतीमध्ये मोहिते पाटील गटाचे संख्याबळ घटले आहे. बदलत्या राजकीय समीकरणांचा फटका मोहिते पाटील गटाला बसला असून सत्तेची समीकरणे बदलताना दिसत आहेत.

उपनगराध्यक्षपदासाठी तानाजी भगत यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. छाननीत त्यांचा अर्ज वैध ठरला आणि निर्धारीत वेळेत इतर कोणाचाही उपनगराध्यक्षपदासाठी अर्ज न आल्याने तानाजी भगत यांची बिनविरोध निवड झाली.

यापूर्वीचे उपनगराध्यक्ष भीमराव रेडे पाटील यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर झाल्यामुळे हे पद रिक्त होते. मात्र, तानाजी भगत यांनी मोहिते पाटील यांची साथ सोडत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भाजपकडून भगत यांना उपनगराध्यक्षपदी संधी देण्यात आली. उपनगराध्यक्षपदासाठी अनेकजण इच्छूक असताना भाजपने भगत यांना संधी दिली आहे.

Deputy President of Shripur-Mahalung Nagar Panchayat
Shivendraraje on Jarange Patil : ‘सातारा गॅझेट’बाबत भाष्य करत शिवेंद्रराजेंची जरांगे पाटलांना विनंती : ‘आपण गडबड केली तर त्याचा...’

तानाजी भगत यांच्या प्रवेशामुळे श्रीपूर-म्हाळुंगमध्ये भाजपला बळ मिळाले आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि माजी आमदार राम सातपुते, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजित शिंदे यांनी श्रीपूर-म्हाळुंगमध्ये लक्ष घातले आहे.

Deputy President of Shripur-Mahalung Nagar Panchayat
Satara Politic's : भाजपच्या ‘ZP’तील डावामुळे रामराजे-मकरंदआबा अन्‌ शंभूराज देसाई ‘डीसीसी’त सावध; मातब्बर नेत्यांची बैठक, ‘सर्वपक्षीय’ची चर्चा

आगामी निवडणुकीच्या दृष्टीने भाजपचे संघटन मजबूत करण्यासाठी मंत्र्यांपासून नेतेमंडळीकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यातूनच नगरपंचायतीत सत्ता स्थापन करताना नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपद मोहिते पाटील गटाकडे होते. मात्र भाजपने आता माेहिते पाटील गटालाच अल्प मतात आणले आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने ही घडामोड मोहिते पाटील यांच्यासाठी धक्कादायक मानली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com