Gokul Dudh Sangh News : 'गोकुळ'च्या खर्चावर संचालकांबरोबर चेअरमन पुत्राचीही केरळ वारी; अनेकांच्या भूवया उंचावल्या!

Abhishek Dongle and Gokul Dudh Sangh : विशेष म्हणजे अभिषेक डोंगळे यांच्याकडे गोकुळचे कोणतेच पद नसताना ते या दौऱ्यात कसे काय होते? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Board of Directors of Gokul Dudh Sangh
Board of Directors of Gokul Dudh SanghSarkarnama
Published on
Updated on

Kerala Trip of Board of Directors of Gokul Dudh Sangh : कोल्हापूर दूध उत्पादक सहकारी संघ अर्थात गोकुळ दूध संघाचे रोज काही ना काही कारणामे समोर येत आहेत. दिवसेंदिवस हे कारणामे उघड होत असून आता नवीन कारनामा समोर आला असून त्यावरू चर्चा सध्या गोकुळमधील अंतर्गत राजकारण हळूहळू तापताना दिसत आहे.

गोकुळ दूध संघाचे(Gokul Dudh Sangh) चेअरमन अरुण डोंगळे यांचे चिरंजीव अभिषेक डोंगळे ज्यांना अनेकजण उपाहासाने प्रतीचेअरमनही संबोधततात, त्यांची केरळवारी चांगलीच चर्चेत आली आहे. अभ्यास दौऱ्यानिमित्त गोकुळच्या संचालकांच्या केरळ दौऱ्यात या प्रतिचेअरमनही होते, ही बाब समोर आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवावर केरळ वारी करणाऱ्या गोकुळ मधील सत्ताधाऱ्यांना काय म्हणावं? याचं कोड आता दूध उत्पादक शेतकऱ्यांना पडले आहे. असंही अनेकजण बोलून दाखवत आहेत.

गोकुळ दूध संघाचा संचालकांचा अभ्यास दौरा जूनच्या शेवटच्या आठवड्यात नुकताच केरळ येथे जाऊन आला. या अभ्यास दौऱ्यात दहापेक्षा जास्त संचालक अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. या अभ्यास दौऱ्यात गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांचे चिरंजीव अभिषेक डोंगळे हे देखील उपस्थित होते.

Board of Directors of Gokul Dudh Sangh
Gokul Scam : ...तर ‘गोकुळ’चे संचालक मंडळ बरखास्त झाले असते; अजूनही वेळ गेलेली नाही : शौमिका महाडिकांचा इशारा

विशेष म्हणजे अभिषेक डोंगळे यांच्याकडे गोकुळचे कोणतेच पद नसताना ते या अभ्यास दौऱ्यासाठी कसे काय उपस्थित होते? सवाल आता दूध उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे. इतकेच नव्हे तर दिल्ली येथे झालेल्या 2023 मध्ये अभ्यास दौऱ्यात अभिषेक डोंगळे यांची उपस्थिती होती. सत्ताधाऱ्यांना याचा जाब विचारणारे कोणी नसल्याने त्याचाही फायदा घेणे सुरू का? असा सवाल केला जात आहे.

दुसरीकडे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवावर केरळ आणि दिल्ली वारी झाल्यानंतर प्रतीचेअरमन यांनी सोशल मीडियावर प्रत्येक क्षणाची चित्रण व्हायरल केल्याचेही दिसत आहे. त्याची चर्चा आता गोकुळच्या राजकारणात दबक्या आवाजात सुरू आहे. स्वतः चेअरमन साहेबांनीच पुत्राचे लाड सुरू केल्यानंतर आता कर्मचारी, अधिकारी तरी कशाप्रकारे जबाबदारीने वागतील असाही प्रश्न उपस्थि होते आहे?

Board of Directors of Gokul Dudh Sangh
Gokul Dudh Sangh : गोकुळ दूध संघात 35 लाखांचा घोटाळा करणाऱ्याला अभय कोणाचे?

दरम्यान, यावर गोकुळचे सत्ताधारी मंडळी काय उत्तर देणार? दौऱ्यात पुत्रप्रेमावर झालेला खर्चाचा तपशील दूध उत्पादक शेतकऱ्यांना आणि सभासदांना देणार का? हे पाहणे महत्वाचे आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com