Gokul Dudh Sangh : गोकुळ मध्ये जनावरांच्या जीवाशी खेळ? निनावी पत्राने उडाली खळबळ !

Kolhapur Cooperative Milk Producers Union Corruption : प्रत्येक औषधे ही मेडिसीन स्टोअरला येण्यापूर्वी त्याची गुणवत्ता तपासणे गरजेचे आहे.परंतू तसे केले जात नाही. त्याचाच फायदा पशुसंवर्धन विभागातील वैद्यकीय अधिकारी घेत आहेत..
Gokul Dudh Sangh
Gokul Dudh SanghSarkarnama

Kolhapur News : गोकुळ तथा कोल्हापूर सहकारी दूध उत्पादक संघात सत्तांतर झाल्यानंतर अनेक मुद्द्यांवरून गोकुळ दूध संघाच्या कामकाजाबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. अशातच गोकुळ दूध चोरी आणि वाहनखर्च ज्यादा दाखवून झालेल्या प्रकरणाची चौकशी सुरू असताना गोकुळ दूध संघातील विरोधक संचालकांच्या हाती एक निनावी पत्र लागले आहे.

हे निनावी पत्र विरोधी संचालकांसह काही वृत्तसंस्थांना देखील पाठविण्यात आले आहे. या निनावी पत्रात पशुसंवर्धन विभागातील प्रमुख डॉक्टरचे नाव असल्याचे समोर आले आहे. संबंधित डॉक्टरवर चौकशी करून निलंबन करण्यात यावं, अशी मागणी या निनावी पत्राद्वारे करण्यात आली आहे.

गोकुळ (Gokul) दूध संघातील विरोधी गटातील काही प्रमुख संचालकांना हे पत्र गुरुवारी सकाळी मिळाले आहे. या पत्रात अत्यंत धक्कादायक खुलासे करण्यात आले असून संबंधित डॉक्टरांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

संबंधित पत्र अज्ञात व्यक्तींनी चेअरमन, संचालक आणि काही वृत्तसंस्थांना पाठविण्यात आले आहे. सर्व सभासद कर्मचारी सुपरवायझर त्यांच्या नावे हे पत्र पाठविण्यात आले आहे. मात्र हे पत्र नक्की कोणी पाठविले याची कोणतीही माहिती नाही. या पत्रावर कोणतीही स्वाक्षरी नाही.

Gokul Dudh Sangh
Shiv Sena: महायुतीचं टेन्शन वाढलं; शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाचे विधानसभेवरून वक्तव्य

नेमके काय आहे पत्रकात?

कोल्हापूर (Kolhapur) जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ लि.कोल्हापूर पशुसंवर्धन विभागास अनेक कंपन्या औषधे पुरवठा करीत असतात. हे औषधांचे टेंडर काढत असताना त्याची गुणवत्ता ही पशुवैद्यकीय अधिकारी यांचे कमिटी मार्फत ठरविली जाते.

परंतू हे करत असताना गेले कित्येक वर्षे पशुसंवर्धन विभागातील डॉ. प्रकाश साळुंखे हे मेडीसीन कंपनीशी परस्पर मिटींग किंवा त्या कंपनीचे संबंधित प्रतिनिधी यांची या औषधे खरेदीवरील कमिशनची टक्केवारी ठरवून घेतात, असा आरोप करण्यात आला आहे. चुकीच्या प्रकारे ही मेडीसीन खरेदी होत आहेत.

Gokul Dudh Sangh
Vinay Kore : विनय कोरे वाढवणार महायुतीची डोकेदुखी; एक दोन नव्हे एवढ्या जागांची मागणी

ज्या कंपन्या औषधे पुरवठा करतात त्या सुरुवातीच्या बँचेस मेडिसीनची गुणवत्ता चांगली असते. त्यानंतर तिच औषधे इंजेक्शन अक्षरशः पाणी भरुन बॉटल दिल्या जातात. परिणामी कोणत्याही औषधाचा, इंजेक्शनचा रिझल्ट येत नाही.

याविषयी बऱ्याच पशुवैद्यकीय अधिकारी यांची तक्रार असतात, वास्तविक प्रत्येक औषधे ही मेडिसीन स्टोअरला येण्यापूर्वी त्याची गुणवत्ता तपासणे गरजेचे आहे.परंतू तसे केले जात नाही.

त्याचाच फायदा डॉ.साळुंखे घेत आहेत. अनेक कंपन्यांशी मोठया प्रमाणात त्यांचे लागेबांधे आहेत. कोट्यावधी रुपयांचे कमिशन त्यांना त्यातून मिळत असते तरी अश्या भ्रष्ट अधिकारी ऑफिस ड्यूटी संपल्यानंतर कोणकोणत्या औषध कंपनीशी मिटींग करत असतात.याची चौकशी करावी. ही चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना निलंबित करणेत यावे, असे या पत्रात म्हंटले आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com