Satara Palakmantri News : शासन आपल्या दारी उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील आमचे सरकार दीड कोटी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले आहे. मात्र, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कधीच शेतकऱ्यांच्या बांधावर गेले नाहीत. ते ऑनलाइन मुख्यमंत्री होते, अशी टीका सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
उद्धव ठाकरेंनी Udhav Thackeray नगर दौऱ्यात शासन आपल्या दारी योजनेवरुन मुख्यमंत्री शिंदेंवर टीका केली आहे. त्या टीकेला उत्तर देण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई Shambhuraj Desai यांनी शासकिय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला.
शंभूराज देसाई म्हणाले, दुष्काळाबाबत आमचे सरकार संवेदनशील असून त्याला कसे तोंड द्यायचे याचे नियोजन केलेले आहे. उद्धव ठाकरे यांनी शासन आपल्या दारी उपक्रमावर आक्षेप घेत टीका केली असून त्यांचे वक्तव्य निराधार आहे. ते जाणीवपूर्वक टीका करत आहेत.
आमचे सरकार दीड कोटी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले आहे. ते मुख्यमंत्री असताना कधीच शेतकऱ्यांच्या बांधावर गेले नाहीत.ते ऑनलाइन मुख्यमंत्री होते. अडीच वर्षांच्या काळात त्यांनी हे का केले नाही. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आम्हीही होतो.
त्यावेळी ते मुख्यमंत्री असताना प्रत्येक जिल्ह्यात जाऊन आपण तेथील प्रश्न सोडवू, असे सांगितले होते. पण त्यांनी आमचे ऐकले नाही. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गावागावात पोहोचले आहेत.वैयक्तिक लाभांच्या योजना लोकांना घरापर्यंत मिळल्या आहेत. आमच्या चांगल्या उपक्रमाकडे जनतेचे लक्ष जातंय म्हणून ते टीका करत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
Edited By Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.