‘राजन पाटील भाजपत जायचे नाहीत; पण त्यांचे दोन्ही चिरंजीव राष्ट्रवादीवर नाराज’

उमेश पाटील यांना थांबविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांनी काहीच ॲक्शन घेतली नाही, असे सांगावयासही आमदार माने विसरले नाहीत.
Rajan Patil -Yashwant Mane
Rajan Patil -Yashwant ManeSarkarnama

मोहोळ (जि. सोलापूर) : गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी मी आणि मोहोळचे माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) एकत्र बसलो होतो, त्यावेळी भारतीय जनता पक्षात (BJP) जायचे याबाबत त्यांनी काहीही सांगितले नाही, त्यामुळे ते भाजपमध्ये जातील, असे मला वाटत नाही. मात्र, त्यांचे दोन चिरंजीव नाराज असल्याची स्पष्टोक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) मोहोळचे आमदार यशवंत माने (Yashwant Mane) यांनी दिली. (Both sons of Rajan Patil are angry with NCP: Yashwant Mane)

मोहोळचे माजी आमदार राजन पाटील व त्यांचे दोन सुपुत्र भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात आहे, त्या पार्श्वभुमिवर आमदार यशवंत माने यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी वरील प्रमाणे माहिती दिली. गेल्या साधारण वर्षभरापासून राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून मतदार संघ पिंजून काढला आहे. ज्या गावात उमेश पाटील जातील, त्या गावात राजन पाटील व त्यांच्या पुत्रांच्या कार्यशैलीचे वाभाडे काढण्याचे एकमेव काम उमेश पाटील यांनी सुरू केले आहे. मात्र, अपवाद वगळता आमदार पाटील यांनी उमेश पाटील यांच्या एकाही टीकेला उत्तर दिले नाही.

Rajan Patil -Yashwant Mane
राजन पाटलांचं अखेर ठरलं : दोन तारखेला भाजपत प्रवेश, बाळराजेंना विधान परिषदेचा शब्द!

राजन पाटील हे भाजपमध्ये गेल्यानंतर आपली भूमिका काय असणार आहे, या बाबत आमदार यशवंत माने यांना विचारले असता, राजन पाटील हेच आमचे नेते असल्याचे आमदार माने यांनी सांगत वेळ मारून नेली. त्यांच्या चिरंजीवाच्या नाराजीबाबत आमदार माने यांना छेडले असता प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील हे कार्यक्रमाच्या माध्यमातून पाटील पिता-पुत्रांवर जहरी टीका करतात, हे पाटील यांना मान्य नाही. राजन पाटील हे स्वाभिमानी नेते असल्याचे आमदार माने यांनी सांगितले.

Rajan Patil -Yashwant Mane
'पवारसाहेब, मी घरी बसतो; पण विधानसभेला वळसे पाटलांनाही घरी बसवा!'

दरम्यान गेल्या दोन दिवसापासून समाज माध्यमावर ‘आमच ठरलंय’ अशी पोस्ट व्हायरल होत आहे, त्यामुळे नेमकं काय ठरलंय याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. मात्र, उमेश पाटील यांना थांबविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांनी काहीच ॲक्शन घेतली नाही, असे सांगावयासही आमदार माने विसरले नाहीत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com