

Solapur, 18 November : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी उज्ज्वला थिटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाेलिस बंदोबस्त उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, आज (ता. 18 नोव्हेंबर) झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीत थिटे यांचा अर्ज बाद झाला आहे. अर्जावर सुचकाची स्वाक्षरी नसल्यामुळे थिटेंचा अर्ज बाद झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी दिली आहे. विशेष म्हणजे थिटे यांच्या उमेदवारी अर्जावर अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी आक्षेप घेतला होता.
उज्ज्वला थिटे (Ujjwala Thite) यांच्या उमेदवारीमुळे 17 नगरसेवक बिनविरोध होऊनही अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लागली होती. नगराध्यक्षपदासाठी केवळ तीनच अर्ज आलेले आहेत. त्यात माजी आमदार राजन पाटील यांची सून प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील यांचा भारतीय जनता पक्षाकडून, तर सरस्वती शिंदे यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. तिसरा अर्ज राष्ट्रवादी काँग्रेसच्या थिटे यांचा होता.
अनगर (Angar ) नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी अवघे तीन अर्ज येऊनही प्रशासनाकडून दुपारी साडेतीनपर्यंत छाननीचे काम चालूच होते. उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज राहणार की नाही, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. मात्र, छाननीत थिटे यांचा अर्ज बादन झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी सांगितले.
दरम्यान, उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाल्यामुळे दुसऱ्या अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे ह्या निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत, त्यामुळे नगराध्यक्षपदी माजी आमदार राजन पाटील यांच्या सूनेची बिनविरोध वर्णी लागणार, असे उघड गुपित आहे.
अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी उज्ज्वला थिटे यांच्या अर्जावर घेतलेले आक्षेप
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उज्ज्वला थिटे यांच्या अर्जावर सूचकाची सही नाही
थिटे यांचा मतदान यादीतील प्रभाग आणि अनुक्रमांक चुकीचा आहे.
थिटे यांनी त्यांच्या वयाचा पुरावा अर्जासोबत जोडलेला नाही
सूचकाचा मतदान यादीतील अनुक्रमांक चुकीचा आहे
महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक अधिनियम 1966 आणि नगरपंचायत नगराध्यपक्षदाच्या थेट निवडीच्या अधिनियमानुसार अर्जाची चौकशी केली. त्यात उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद असल्याचे आढळून आले आहे, असेही मुळीक यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.