

सांगोला नगरपरिषद निवडणुकीत भाजपने शहाजीबापू पाटील यांना वगळून शेतकरी कामगार पक्षासोबत युती केल्याने त्यांनी भाजपवर तीव्र टीका केली.
शहाजीबापू पाटील यांनी भाजप नेतृत्वाने संवाद न साधल्यामुळे महायुती तुटल्याचे सांगत भविष्यात फडणवीस-शिंदे यांना याची परीक्षा घ्यावी लागेल, असा इशारा दिला.
सांगोल्यात सर्व पक्ष एका बाजूला असून ते एकटे असूनही नगराध्यक्ष शिवसेनेचाच होईल, असा आत्मविश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
Solapur, 18 November : सांगोला नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपने माजी आमदार शहाजीबापू पाटील यांना वगळून शेतकरी कामगार पक्षासोबत युती केली आहे, त्यामुळे संतापलेल्या शहाजीबापूंनी भाजपवर तुफान हल्ला चढवत चौफेर टीकास्त्र सोडले आहे. भारतीय जनता पक्षाचे सांगोल्यातील वागणं म्हणजे हिडिस, किळसवाणं, आणि एखाद्या अबलेवर केलेला बलात्कार असावा, अशा पद्धतीचं आहे. सांगोल्याची स्वाभिमानी जनता सहजासहजी कोणाचा दहशतवाद मान्य करणार नाही, असा टोलाही त्यांनी भाजप नेत्यांना लगावला.
माजी आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) म्हणाले, सांगोला नगर परिषदेसाठी शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मजबूत महायुती होऊ शकत होती. पण, भारतीय जनता पक्षाने आम्हाला कोणताही प्रतिसाद न देता एकतर्फीपणे सगळ्या नगर परिषदांच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याचा घाट घातल्यामुळे दुर्दैवाने जिल्ह्यात सर्व ठिकाणी युती तुटली आहे. त्यामुळे महायुतीमधील सर्व कार्यकर्त्यांना स्वतंत्र्यपणे निवडणुका लढवाव्या लागत आहेत.
सोलापूर जिल्ह्यात महायुती न होण्यासाठी कोण जबाबदार, यासाठी मला कोणाचेही नाव घ्यायचे नाही. पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे निवडणुकीच्या निकालानंतर त्याचा निश्चितपणे विचार करतील. या घडामोडींचे निश्चितपणे परीक्षण झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही पाटील यांनी दिला.
माजी आमदार पाटील म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने होणाऱ्या घडामोडीची बारकाईने माहिती देत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या जिल्हाध्यक्षांसोबत (चेतनसिंह केदार-सावंत) गेल्या पंधरा दिवसांत मी तीन वेळा बैठका घेतल्या. ते बैठकीत मुख्यमंत्रीसाहेबांना कळवतो, एवढंच सांगत होते. पण पुढे काय झालं, मला माहिती नाही? माझा कोणावरही आरोप नाही, मी कोणावरही नाराज नाही. हे सगळं भोगायची मला गेली ४५ वर्षांत सवय झाली आहे.
काँग्रेसमध्ये असतानाही काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते (स्व.) गपणतराव देशमुख यांना कशी मदत केली जात होती, हे आम्ही बघत आलो आहोत. ह्या सवयी आम्हाला जुन्या आहेत. पण, मी खात्रीनं सांगतो की, गुलाल हा शिवसेनेचाच असणार. सांगोल्याचा नगराध्यक्ष हा शिवसेनेचा असणार. कारण, सांगोल्याची जनता ही प्रचंड स्वाभिमानी आहे.
भाई गणपतराव देशमुख आणि शहाजीबापू पाटलांच्या विचारांच्या धाटणीत घडलेला आमचा मतदार आहे. हा मतदार सहजा सहजी कोणाचा दहशतवाद मान्य करणार नाही. सांगोल्यात अटीतटीची लढाई होईल. पण, विजय शिवसेनेचाच होईल. सांगोल्यात नगराध्यक्ष माझाच होणार आहे, असेही शहाजीबापू म्हणाले.
माजी आमदार पाटील म्हणाले, सांगोल्याच्या राजकारणात आज प्रथमच मला भाई गणपतराव देशमुख यांची आठवण आली. आज हिडिस, किळसवाणं, आणि एखाद्या अबलेवर केलेला बलात्कार असावा, अशा पद्धतीचं भारतीय जनता पार्टीचं वागणं सांगोल्यात दिसून आलं आहे. सांगोला हे एक राजकारणाचे प्रतीक आहे. असंच राजकारण सांगोल्यात होणार असेल तर वैभवशाली महाराष्ट्राच्या परंपरा उद्ध्वस्त झालेल्या तुम्हाला दिसतील.
सांगोल्यात आज भाजप, शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस हे सर्व पक्ष एका बाजूला आणि मी (शिवसेना) एका बाजूला एकटा आहे. अशी परिस्थिती या ठिकाणी बाहेरच्या माणसांनी निर्माण केलेली आहे. हे माझ्या जनतेला आवडलेलं नाही, असंही शहाजी पाटील यांनी सांगितले.
1. शहाजीबापू पाटील भाजपवर का नाराज आहेत?
→ भाजपने त्यांना वगळून शेतकरी कामगार पक्षाशी युती केली आणि कोणताही संवाद साधला नाही.
2. सांगोल्यात महायुती का तुटली?
→ भाजपने सर्व निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे.
3. पाटील नगराध्यक्षपदाबद्दल काय म्हणाले?
→ नगराध्यक्ष शिवसेनेचाच होईल, असा त्यांचा ठाम दावा आहे.
4. सांगोल्याची राजकीय परिस्थिती कशी आहे?
→ सर्व पक्ष एका बाजूला असून शहाजीबापू पाटील एकटे सामना करीत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.