मोहिते पाटील समर्थक भाजपमधून निलंबित : विजयदादा, रणजितसिंह यांना सूचक इशारा

श्रीपूर नगरपालिका निवडणुकीत पक्षाचे अधिकृत उमेदवार निवडणूक रिंगणात असताना मोहिते पाटील परिवारातील (Mohite Patil) एकही सदस्य पक्षीय व्यासपीठावर दिसला नाही.
Mohite-Patil

Mohite-Patil

Sarkarnama

Published on
Updated on

श्रीपूर : महाळूंग-श्रीपूर नगरपंचायत निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेतल्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या माळशिरस तालुकाध्यक्ष कल्पना मिलींद कुलकर्णी व तालुका सरचिटणीस संदीप सुरेश घाडगे यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. मोहिते पाटील समर्थक असणाऱ्या या दोन पदाधिऱ्यांवर पक्षाने निलंबनाची कारवाई केल्याने भाजपाने थेट मोहिते पाटलांनाच (Mohite Patil) इशारा दिल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात उमटली आहे.

<div class="paragraphs"><p>Mohite-Patil</p></div>
‘रिमोट कंट्रोल’चा फोन आला अन्‌ विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली!

महाळूंग-श्रीपूर नगरपंचायत निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडीनंतर अनिल जाधव यांच्या गटाला पक्षाने एबी फॉर्म दिले होते. राज्यात सर्वात मोठा पक्ष असताना महाळूंग-श्रीपूर नगरपंचायत निवडणुकीत पक्ष स्वतःच्या चिन्हावर निवडणूक लढवू शकत नसल्याची सल पक्षश्रेष्टींच्या मनात होती. मोहिते-पाटील समर्थक गटाच्या सर्व नेत्यांना पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याबाबत विनवणी करण्यात येत होती. मात्र, हे सर्वच गट आपापल्या ताकदीवर निवडणूक लढविण्यावर ठाम होते. गटाच्या माध्यमातून निवडणूक लढवू असे सांगून पक्षाला खेळविले जात होते. याची गंभीर दखल घेत, ही निवडणूक चिन्हावर लढविण्याचे पक्षाने ठरविले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पक्षाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रदेश सरचिटणीस सरचिटणीस श्रीकांत भारतीय, मकरंद देशपांडे आदी कोअर कमिटीच्या नेत्यांनी पक्षाच्या चिन्हावर लढण्याचा निर्णय घेतला. अनिल जाधव यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला त्यामुळे, भाजपची नामुष्की टळली आणि सर्व जागावर भाजपाने आपले उमेदवार दिले.

<div class="paragraphs"><p>Mohite-Patil</p></div>
उद्धवजींच्या शस्त्रक्रियेनंतर फडणवीसांचा रश्मीवहिनींना फोन; म्हणाले, ठाकरे कुटुंबीयांचे आमच्यावर उपकार!

पक्षीय पातळीवर निवडणूकपूर्व तयारी होत असताना या निवडणुकीची सर्व जबाबदारी पक्षाचे जिल्हा सरचिटणीस धैर्यशिल मोहिते पाटील यांच्यावर दिल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे उमेदवार निश्‍चित करणे, प्रचारनिती ठरविणे या पातळीवर त्यांची प्रमुख भूमिका असेल असे मानले जात होते. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीतील चित्र वेगळेच राहिले. अनिल जाधव यांच्याकडे या निवडणुकीची सूत्रे देऊन भाजपाने एक प्रकारे मोहिते पाटील गटाला या निवडणुकीपासून दूर ठेवल्याचे संकेत दिले होते.

पक्षाचे अधिकृत उमेदवार निवडणूक रिंगणात असताना मोहिते पाटील परिवारातील एकही सदस्य पक्षीय व्यासपीठावर दिसला नाही. मोहिते पाटलांच्या अनुपस्थितीमुळे निवडणुक काळात लोकांमध्ये वेगवेगळ्या चर्चा होत राहिल्या. अशावेळी, पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य के. के. पाटील आणि जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी या निवडणुकीत पक्षाची धुरा नेटाने सांभाळली.

निवडणुकीत भाजपाच्या महिला विभागाच्या तालुकाध्यक्षा कल्पना कुलकर्णी आणि तालुका सरचिटणीस सुरेश घाडगे यांच्या पत्नी जयश्री घाडगे या निवडणुकीच्या रिंगणात होत्या. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढविली आहे. याची पक्षाने गंभीर दखल घेतली आहे. हे दोन्ही पदाधिकारी मोहिते पाटील समर्थक असल्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, हा अंदाज अखेर पक्षाने साफ खोटा ठरवला आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी या दोघांना पक्षातून निलंबित केले असल्याचे पत्राद्वारे कळविले आहे.

महाळूंग श्रीपूर नगरपंचायतीच्या १३ जागांची निवडणुक झाली आहे. चार जागांची निवडणुक प्रक्रिया सुरू आहे. आता या कारवाईनंतर मोहिते पाटील समर्थकांची भुमिका काय राहते. हे पहावे लागणार आहे. तर दुसरीकडे वाट्टेल ते झाले तरी, उर्वरीत जागांवर सुध्दा पक्षाच्या चिन्हावरच निवडणूक लढवायची असा निर्धार भाजपने केला आहे. त्यामुळे मोहिते पाटील आणि भाजपमधील ही शीतयुद्ध सुरूच राहण्याचे संकेत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com