Independence Day : पवारांच्या राष्ट्रवादीच्या सोलापूरमधील नेत्याविरोधात गुन्हा दाखल; स्वातंत्र्यदिनी जीर्ण, फाटका राष्ट्रध्वज फडकावला

Solapur NCP SP Leader : स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजवंदनासाठी तयारी करण्याबाबत बँकेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकांचा कसलाही संबंध येत नाही. ध्वजवंदनाची संपूर्ण तयारी हे बॅंकेचे कर्मचारी करत असतात.
U. N. Beriya
U. N. Beriya Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 16 August : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी महापौर ॲड. यू. एन. बेरिया हे अडचणीत सापडले आहेत. स्वातंत्र्यदिनी सोलापूर सोशल अर्बन को ऑपरेटिव्ह बॅंकेच्या कार्यालयासमोर जीर्ण आणि फाटलेला राष्ट्रध्वज फडकाविल्याप्रकरणी बॅंकेचे अध्यक्ष या नात्याने ॲड बेरिया आणि बॅंक व्यवस्थापकांच्या विरोधात सोलापूर शहरातील फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, बँकेचे थकबाकीदार आणि काही दुखावलेले लोक असतात, त्यांना काहीतरी निमित्त लागते. त्यामुळे तक्रार देतात. पण, पोलिसांच्या चौकशीत सत्य समोर येईल, असे बॅंकेचे अध्यक्ष ॲड. यू. एन. बेरिया (U. N. Beriya) यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

इब्राहिम अल्लाबक्ष जमादार (रा. रामवाडी, अहिलेदिस मशिदीजवळ, सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात सोलापूर (Solapur) फिर्याद दिली आहे, त्यानुसार माजी महापौर ॲड बेरिया आणि बॅंकेचे व्यवस्थापक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोलापूर सोशल अर्बन को. ऑपरेटिव्ह बॅंकेच्या सिध्देश्वर पेठेतील कार्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त (Independence Day) शुक्रवारी (ता. 15 ऑगस्ट) ध्वजवंदनाचा कार्यक्रम झाला. बँकेचे अध्यक्ष यू. एन. बेरिया आणि व्यवस्थापकांनी राष्ट्रध्वज सुस्थितीत आहे की नाही, याची खात्री न करताच राष्ट्रध्वज फडकाविण्यात आला आहे.

U. N. Beriya
Dilip Walse Patil : लाल दिव्याची गाडी सोडून गेलो अन्‌ त्या शाळेतील शिक्षकांनी मला मंत्री असूनही एक तास वेटिंगवर ठेवले!

वास्तविक राष्ट्रध्वजातील केशरी रंगाची पट्टी फाटलेली तसेच, हिरव्या रंगाच्या पट्टीवर छिद्र पडलेले होते. राष्ट्रध्वजही जीर्ण झालेला आहे, त्यावरील रंगही फिकट झाला आहे. फाटलेला आणि जीर्ण राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाचा अपमान करण्यात आला आहे, असे फिर्यादीत जमादार यांनी म्हटले आहे.

जामदार यांच्या फिर्यादीवरून बॅंकेचे अध्यक्ष यू. एन. बेरिया आणि बॅंकेच्या व्यवस्थापकांच्या विरोधात गुन्हा फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यत आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक विजय जाधव या प्रकरणी तपास करीत आहेत.

U. N. Beriya
Voter List Fraud : मतदारयादीतील घोळाचा भांडाफोड काँग्रेसवरच बुमरँग होणार?; माजी मुख्यमंत्र्यांवर बोगस व्होटिंगचे आरोप

यासंदर्भात सोलापूर सोशल अर्बन को. ऑपरेटिव्ह बॅंकेचे अध्यक्ष ॲड यू. एन. बेरिया यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, बँकेचे थकबाकीदार आणि काही दुखावलेले लोक असतात. त्यांना काहीतरी निमित्त लागते, त्यामुळे तक्रार देतात. स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजवंदनासाठी तयारी करण्याबाबत बँकेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकांचा कसलाही संबंध येत नाही. ध्वजवंदनाची संपूर्ण तयारी हे बॅंकेचे कर्मचारी करत असतात. जी फिर्याद देण्यात आलेली आहे, त्यात कोणतीही वस्तुस्थिती नाही. त्यामुळे पोलिसांच्या चौकशीत सत्य समोर येईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com