Udayanraje On Reservation : जातनिहाय जनगणना करा अन ज्याचा त्याचा वाटा देऊन टाका; आरक्षणावर उदयनराजेंची रोखठोक भूमिका

Koregaon BJP Melava : मराठा आरक्षणप्रश्र्नी 23 मार्च 1994 रोजीचा अध्यादेश हा कळीचा मुद्दा ठरलेला आहे. त्यात मराठ्यांना डावलून माळी, धनगर, वंजारी असे सर्वांना आरक्षण देण्यात आले.
Udayanraje Bhosale
Udayanraje BhosaleSarkarnama

पांडुरंग बर्गे

Koregaon, 21 June : मराठा आरक्षणप्रश्र्नी २३ मार्च १९९४ चा अध्यादेश हा कळीचा मुद्दा ठरला आहे. त्यात मराठ्यांना डावलून माळी, धनगर, वंजारी असे सर्वांना आरक्षण देण्यात आले. त्यामुळे सध्या जातीजातीत तेढ निर्माण झाला असून दिवसेंदिवस जाती जातीत दुफळी माजत आहे. तेव्हा एकदाची जातनिहाय जनगणना करून ज्यांचा त्यांना वाट्याप्रमाणे आरक्षण देऊन टाकावे, अशी रोखठोक भूमिका खासदार उदयनराजे भोसले यांनी मांडली.

सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाकडून विजयी झालेले खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी कोरेगावातील आभार मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी आरक्षण प्रश्नावर आपली भूमिका मांडली. उदयनराजे म्हणाले, मराठा आरक्षणप्रश्र्नी २३ मार्च १९९४ रोजीचा अध्यादेश हा कळीचा मुद्दा ठरलेला आहे. त्यात मराठ्यांना डावलून माळी, धनगर, वंजारी असे सर्वांना आरक्षण देण्यात आले. जातीजातीत तेढ निर्माण झाली आहे.

त्यावेळी आपण कोणी नव्हतो. त्यावेळी मी तत्कालीन पंतप्रधान आणि आमचे नातेवाईक असलेल्या व्ही. पी. सिंग यांना भेटून याबाबत बोललो असता त्यांनी ‘व्होट बँके’चे कारण पुढे केले. त्यावेळी शरद पवार यांनी ही बाब चुकीची आहे, असे मत मांडणे आवश्यक होते. आपण कधीही जातपात मानलेली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे सर्वधर्म समभाव आपण मानत आलो आहे. आज जातीचा वापर केवळ आणि केवळ स्वार्थासाठी केला जात आहे, अशी स्पष्ट टीकाही खासदार भोसले यांनी केली.

उदयनराजे म्हणाले, का माहीत नाही पण माझ्याबद्दल अनेकांनी अनेक गैरसमज करून ठेवले आहेत. माझ्याबाबत अपप्रचार केलेला आहे. मी आजवर गटबाजी केली नाही, अडवाअडवी केलेली नाही, ही माझी चूक झाली आहे का, असा प्रश्न करून जिल्ह्यात कोणी ताम्रपट घेऊन आलेले नाही. मात्र, एक सांगतो शिवेद्रसिंहराजे आणि मी एकत्र आल्यावर नव्हे एकत्र आलेलो आहोत. आता राजकारण काय असते ते दाखवून देऊ.

Udayanraje Bhosale
Praniti Shinde's Dabang Statement : प्रणिती शिंदेंची दबंग स्टेटमेंट

महेश शिंदे, मनोज घोरपडे, अतुल भोसले हेही आमच्यासोबत आहेत. बघू महेश शिंदेंना कोण निवडून येऊ देत नाही, असे सांगून खासदार भोसले म्हणाले, "मी नसतो तर त्यावेळी आताचे माजी आमदार ताईंच्या विरुद्ध निवडून तरी आले असते का. कारखान्याची वाटही त्यांनीच लावली. व्यक्तीदोष करू नका. महेश शिंदे व प्रियाताई शिंदे हे पती-पत्नी दिवसरात्र समाजाचे काम करत आहेत. अक्षरशः जीवाचा आटापीटा करत आहेत. त्यांच्या कामाचे मोजमाप करणार की नाही.

आज विविध विकास कामांबद्दल बोलायचे झाल्यास कोरेगावचे आजवरचे एकूण सर्व आमदार एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला एकटे महेश शिंदे अशी स्थिती आहे. तेव्हा आपण सर्वांनी पुन्हा त्यांना पाठबळ देवू या. जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचेच सरकार आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करू या, असे आवाहनही उदयनराजे भोसले यांनी केले.

Udayanraje Bhosale
Vidhan Parishad Election : विधान परिषदेसाठी काँग्रेसकडून या तीन नावांची चर्चा; एकावर होणार शिक्कामोर्तब

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com