Udayanraje Bhosale : खासदार उदयनराजे मानणार मतदारांचे आभार ; कोरेगाव, पाटण, कराडमध्ये मेळाव्यांचे आयोजन!

Udayanraje Bhosale will thank the voters : सामान्य मतदारांच्या जोरावर मिळालेल्या या विजयश्रीचे खरे श्रेय महायुतीमधील प्रत्येक कार्यकर्त्यांचे आणि पदाधिकारी यांचे असल्याचं सांगण्यात आलं आहे.
Udayanraje Bhosale
Udayanraje BhosaleSarkarnama

Udayanraje Bhosale and Satara Constituency News: सातारा लोकसभा निवडणुकीत जनतेने भाजप आणि महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना विजयी केलं आहे. त्यामुळे आता जनतेचे आभार मानण्याचा निर्णय उदयनराजे भोसले यांनी घेतला आहे. यासाठी शुक्रवार(21जून)पासून दोन दिवसांचा आभार दौरा करणार आहेत.

सामान्य मतदारांच्या जोरावर मिळालेल्या या विजयश्रीचे खरे श्रेय महायुतीमधील प्रत्येक कार्यकर्त्यांचे आणि पदाधिकारी यांचे आहे.त्यामुळेच जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या ऋणात राहुनच त्याचे आभार मानण्यासाठी या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.

या आभार दौऱ्याची सुरुवात शुक्रवारी सकाळी 11 वाजता 'जितराज' मंगल कार्यालय कोरेगाव येथून होणार आहे. येथे आमदार महेश शिंदे, डॉ प्रिया शिंदे, डॉ. अरुणा बर्गे, शिवाजीराव महाडिक, सुनील खत्री,जयवंत पवार, भरत मुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा आभार मेळावा होणार आहे.

Udayanraje Bhosale
Udayanraje & Pankaja Munde : पंकजाताईंना दिलेला शब्द उदयनराजे पाळणार; राजीनामा देणार का?

त्याच दिवशी सायंकाळी सहा वाजता कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील अश्वमेध मंगल कार्यालय मसूर या ठिकाणी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, कराड उत्तर विधानसभा निवडणूक प्रमुख मनोज घोरपडे, रामकृष्ण वेताळ, चित्रलेखा कदम, कुलदीप क्षीरसागर, संपतराव माने, वासुदेवराव माने, भीमराव पाटील, शंकर शेजवळ, शेतकरी संघटनेचे सचिन नलावडे, जितेंद्र डुबल, मनसेचे विकास पवार आदींच्या उपस्थितीत मेळावा होईल.

दुसऱ्या दिवशी शनिवारी (ता. 22) दुपारी एक वाजता दिवंगत बाळासाहेब देसाई शताब्दी सभागृह मरळी (ता. पाटण) या ठिकाणी पालकमंत्री शंभूराज देसाई, रविराज देसाई, यशराज देसाई, नरेंद्र पाटील, भरत पाटील, विक्रमबाबा पाटणकर, कविता कचरे, संजय देसाई यांच्या उपस्थितीत मेळावा होईल.

त्यानंतर सायंकाळी सहा वाजता कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. सुरेश भोसले, सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले, विनायक भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, विक्रम पावसकर, कराड दक्षिण शिवसेना नेते राजेंद्र यादव, कराड दक्षिण विधानसभा निवडणूक प्रमुख धनाजी पाटील, राजेश पाटील, विजु यादव, सुधीर येकांडे यांच्या उपस्थितीत मेळावा होईल.

Udayanraje Bhosale
Madha Politics : जो न्याय उदयनराजेंना तोच... मोहिते पाटलांकडून पराभूत झालेल्या निंबाळकरांच्या पुनर्वसनासाठी कोण उतरलं मैदानात?

या दौ-यात रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, कवाडे गटाचे युवराज कांबळे, मनसे नेते धैर्यशील पाटील, युवराज पवार, डॉ. महेश गुरव, हिम्मतराव माने, पवन निकम आदी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे उदयनराजे भोसले यांना पाठिंबा दर्शवणाऱ्या मेळाव्यांना उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपचे सातारा लोकसभा संयोजक सुनील काटकर यांनी केले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com