

‘सरपंच पती’ प्रथेविरोधात केंद्र सरकारने देशव्यापी कडक कारवाईची घोषणा केली आहे.
महिला सरपंचांना स्वतंत्र निर्णय घेता यावेत यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे.
महिला सक्षमीकरणासाठी ३५ सूचकांकांचा डॅशबोर्ड विकसित करण्यात आला आहे.
Pune News : महिला सरपंचांच्या नावाखाली त्यांचे पतीच ग्रामपंचायतीचा कारभार हाकत असल्याची राज्यासह देशभरात होताना दिसत. पण आता या ‘सरपंच पती’ प्रथेविरोधात केंद्र सरकारने कठोर पावले उचलली आहेत. या काळजी वाहू कारभाऱ्यांना केंद्र सरकार मोठा दणका देणार आहे.
ग्रामीण भारतात रुजलेल्या 'सरपंच पती'या वाईट प्रथेला आता केंद्र सरकारने थेट आव्हान दिले आहे. महिला सरपंचांच्या नावावर निवडणूक जिंकून प्रत्यक्ष कारभार मात्र त्यांच्या पती किंवा पुरुष नातेवाइकांकडून चालवला जाण्याच्या या प्रथेविरोधात आता कठोर पावले उचलली जाणार आहेत.
पुण्यात आयोजित 'महिला स्नेही ग्रामपंचायत' या राष्ट्रीय कार्यशाळेत पंचायती राज मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव सुशीलकुमार लोहाणी यांनी ही महत्त्वाची माहिती दिली. ते म्हणाले, “महिला लोकप्रतिनिधींना केवळ कागदोपत्री किंवा सह्यांपुरते मर्यादित ठेवता येणार नाही. त्यांना स्वतंत्रपणे, सुरक्षित आणि सन्मानजनक वातावरणात निर्णय घेता यावेत आणि ग्रामपंचायतीचा प्रत्यक्ष कारभार हाकता यावा यासाठी 'सरपंच पती' ही प्रथा पूर्णपणे निर्मूलन करणे गरजेचे आहे.”
या उद्देशासाठी केंद्र सरकार लवकरच देशव्यापी विशेष मोहीम राबवणार असून, या प्रथेत सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती लोहाणी यांनी इशारा दिला आहे. तसेच महिला सरपंचांना त्यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी आवश्यक कौशल्ये, आत्मविश्वास आणि सुरक्षितता उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येईल असं ही ते म्हणाले.
'सरपंच पती' ही प्रथा नेमकी काय?
महिलांसाठी पंचायती राज संस्थांमध्ये ३३ ते ५० टक्के जागा राखीव असल्या तरी अनेक ठिकाणी निवडून आलेल्या महिला सरपंचांच्या निर्णयांवर त्यांचे पती किंवा पुरुष नातेवाइकांचे नियंत्रण असते. यामुळे महिलांचे सक्षमीकरणाचे खरे उद्दिष्ट अपूर्ण राहते आणि ग्रामीण स्तरावर खरा बदल घडत नाही.
पण आता केंद्र सरकारच्या या नव्या पावलामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या खऱ्या नेतृत्वाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरू शकतो.
1. ‘सरपंच पती’ प्रथा म्हणजे काय?
महिला सरपंचांच्या नावाखाली त्यांचे पती ग्रामपंचायतीचा प्रत्यक्ष कारभार चालवणे.
2. या प्रथेविरोधात कोण कारवाई करणार आहे?
केंद्र सरकार व पंचायत राज मंत्रालय.
3. ही माहिती कुठे जाहीर करण्यात आली?
पुण्यात झालेल्या ‘महिला स्नेही ग्रामपंचायत’ राष्ट्रीय कार्यशाळेत.
4. महिलांसाठी कोणती नवी योजना जाहीर करण्यात आली आहे?
महिला आर्थिक साक्षरता व आरोग्यासाठी ३५ सूचकांकांचा डॅशबोर्ड.
5. या मोहिमेचा मुख्य उद्देश काय आहे?
महिला लोकप्रतिनिधींना सुरक्षित व सन्मानजनक वातावरणात प्रत्यक्ष कारभाराची संधी देणे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.