Ram Shinde : ‘बालपणी मी अतिशय खोडकर होतो’; मामाच्या गावी आलेले सभापती राम शिंदेंनी बोलून दाखवली ‘ती’ खंत!

Karmala Political News : पोथरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रा. राम शिंदे यांचे प्राथमिक शिक्षण झाले आहे, तर करमाळ्यातील महात्मा गांधी विद्यालयात माध्यमिक शिक्षण झाले आहे. पोथरे हे प्रा. राम शिंदे यांचे आजोळ आहे.
Ram Shinde-Narayan Patil
Ram Shinde-Narayan Patilsarkarnama
Published on
Updated on

Karmala, 23 March : विधान परिषदेच्या सभापतिपदी निवड झाल्याबद्दल प्रा. राम शिंदे यांचा आजोळी म्हणजेच सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यातील पोथरे या गावी विशेष सन्मान करण्यात आला. सत्कारासाठी आलेले राम शिंदे हे आजोळातील लहानपणीच्या आठवणीत रंगले होते. मी लहानपणी अतिशय खोडकर होतो. मी कडू कुटुंबीयांचा भाचा असलो तरी पोथरे येथील गावकऱ्यांनीही मला तेवढाच जीव लावला. हे सांगताना प्रा. राम शिंदेंनी एक खंतही बोलून दाखवली.

प्रा. राम शिंदे आणि आमदार नारायण पाटील यांचा पोथरे (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथे ग्रामस्थांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी गावाचा भाचा विधान परिषदेचा सभापती झाल्याने गावकऱ्यांनी राम शिंदे (Ram shinde) आणि आमदार म्हणून निवडून आलेले नारायण पाटील यांची सजवलेल्या बैलगाडीतून ढोल ताशाच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत मिरवणूक काढली.

पोथरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रा. राम शिंदे यांचे प्राथमिक शिक्षण झाले आहे, तर करमाळ्यातील (Karmala) महात्मा गांधी विद्यालयात माध्यमिक शिक्षण झाले आहे. पोथरे हे प्रा. राम शिंदे यांचे आजोळ आहे. ते म्हणाले, पोथरे गावात माझं बालपण गेलं आहे. या गावाविषयी माझ्या मनात अनेक आठवणी आहेत. विधान परिषदेच्या सभापतिपदापर्यंत पोहोचण्यात पोथरे गावाचेही माझ्या जडणघडणीत मोठे योगदान आहे. या गावानेच माझ्या जीवनाला दिशा दिली आहे.

Ram Shinde-Narayan Patil
Babasaheb Deshmukh : सत्तेच्या जवळ गेलेले बाबासाहेब देशमुखांवर आमदार खरेंचा हल्ला; ‘देशमुख आता बहुजन, धनगर समाजाचे नेते राहिले नाहीत, ते ब्राह्मणांचे नेते झालेत’

लहानपणीच्या पोथरे गावातील अनेक आठवणी माझ्या स्मरणात आहेत. लहान असताना मी अतिशय खोडकर होतो. मी कडू कुटुंबीयांचा भाचा असलो, तरी पोथरे गावातील ग्रामस्थांनी माझ्यावर केलेले प्रेम मी कधीच विसरू शकत नाही. पोथरे हे माझ्या जीवनाला दिशा देणारे गाव असून त्यामुळेच मी सभापतीपदापर्यंत पोहोचू शकलो आहे, अशी भावनाही राम शिंदे यांनी बोलून दाखवली.

सभापती राम शिंदे म्हणाले, पोथरे येथील शनि देवस्थान मंदिराचा विकास होणे आवश्यक आहे. मी पहिल्यांदा पर्यटन मंत्री झालो, त्यावेळी शनी मंदिराच्या विकासासाठी निधी मिळावा; म्हणून माझ्याकडे कोणीही आलं नाही. मंत्रीपद गेल्यानंतर मात्र माझ्याकडे आले. कोट्यवधींचा निधी देण्याचा मला अधिकार होता. आता या मंदिराकडे गेल्यानंतर मला त्याची आठवण झाली. आताही वेळ गेली नाही; पुन्हा ती संधी आली आहे. तेव्हा फक्त एका विभागाचा मंत्री होतो, आता सर्व विभागाचे मंत्री माझ्याकडे येतात. त्यामुळे निधीसाठी अडचण नाही. शनिमंदिर हे साडेतीन पीठापैकी एक शक्तीपीठ आहे. या देवस्थानचा विकास झाला पाहिजे. त्यासाठी मी निश्चित लक्ष घालणार आहे.

Ram Shinde-Narayan Patil
Ajit Pawar-Jayat Patil Meeting : अजित पवार-जयंत पाटील भेटीवर पडळकरांचा मोठा दावा; म्हणाले, ‘सत्तेसाठी कितीही लाचार होण्याची जयंतरावांची तयारी...’

करमाळा तालुक्यासाठी रिटेवाडी उपसा सिंचन योजना राबवणे अत्यंत गरजेचे आहे. विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी याबाबत लक्ष घालावे, आपण लक्ष घातल्यास या योजनेसाठी मदत होईल, अशी अपेक्षाही राम शिंदे यांनी व्यक्त केली.

यावेळी पोलिस निरीक्षक विनोद घुगे, गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम, ऍड. राहुल सावंत, प्रमोद झिंजाडे, सरपंच अंकुश शिंदे, संदीप शिंदे, भाजपचे गणेश चिवटे, विठ्ठल शिंदे, हरिभाऊ झिंजाडे आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com