
मामा-भाच्यांमध्ये राजकीय संघर्ष – विधानसभा निवडणुकीत राजेश पाटील (महायुती) आणि त्यांचे मामा गोपाळराव पाटील (महाविकास आघाडी समर्थक) एकमेकांच्या विरोधात होते.
बाजार समितीच्या कार्यक्रमात एकत्र मंचावर – सत्कार सोहळ्यात दोघे एकाच व्यासपीठावर आले आणि भाषणात सौम्य टोलेबाजी झाली.
एकजुटीचा मुद्दा चर्चेत – चंदगडमधील भविष्यातील विकासासाठी 'एकजूट' ठेवण्याची दोघांनी अप्रत्यक्ष मागणी केली, पण राजकीय तणाव अधोरेखित झाला.
Kolhapur News: नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत चंदगड विधानसभा मतदारसंघात मामा भाचे एकमेकांच्या विरोधात दिसले. महायुती राष्ट्रवादीचे उमेदवार माजी आमदार राजेश पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात होते. तर त्यांचे मामा महाविकास आघाडीतील नेते गोपाळराव पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवार आप्पी पाटील यांच्या प्रचारात सहभाग घेतला होता.
त्यामुळे विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात असताना अपक्ष उमेदवारांचा फटका महायुतीचे उमेदवार राजेश पाटील यांना देखील बसला. अशातच बाजार समितीच्या एका कार्यक्रमात व्यासपीठावरच मामा-भाच्यांमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन पदाधिकारी सत्कार कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी आमदार राजेश पाटील व त्यांचे मामा गोपाळराव पाटील दोघे एकाच व्यासपीठावर आले होते. तर भाजपचे नेते माजी राज्यमंत्री भरमू पाटील त्याठिकाणी होते.
गडहिंग्लज बाजार समितीची निवडणूक दोन वर्षांपूर्वी सर्व नेत्यांनी मिळून बिनविरोध केली. त्यावेळी झालेल्या राजकीय कराराप्रमाणे वर्षातून पदाधिकारी निवडी करून नेते शब्द पाळत असल्याचा उल्लेख इतर वक्त्यांनी केला.
त्याचा धागा पकडून गोपाळराव पाटील म्हणाले, ‘प्रत्येक तालुक्याला आता बाजार समिती होणार आहे. चंदगडमध्ये होणारी मार्केट कमिटीही चांगल्या पद्धतीने करण्यासाठी प्रयत्न करू.’ त्यांचे भाषण सुरू असतानाच खुर्चीवर बसलेले त्यांचे भाचे राजेश पाटील यांनी मध्येच, त्यासाठी अशीच एकजूट ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली.
त्यावर गोपाळरावांनी काही सेंकद स्तब्ध राहून ‘ही एकजूट प्रत्येकांनी पाळायला हवी’, असा पलटवार केला. त्यावर मात्र भाच्यांनी कोणतेच भाष्य केले नाही. उपस्थितांना काही समजायच्या आतच या टोलेबाजीला तेथेच पूर्णविराम मिळाला. यावेळी अशोक चराटी, जनता दलाच्या स्वाती कोरी, काँग्रेसचे विद्याधर गुरबे, बाळेश नाईक यांची भाषणे झाली.
Q1. राजेश पाटील आणि गोपाळराव पाटील यांच्यात काय संबंध आहे?
राजेश पाटील हे गोपाळराव पाटील यांचे भाचे आहेत.
Q2. दोघे निवडणुकीत कोणकोणत्या बाजूने होते?
राजेश पाटील महायुतीचे उमेदवार होते, तर गोपाळराव पाटील अपक्ष उमेदवाराच्या प्रचारात होते.
Q3. बाजार समितीच्या कार्यक्रमात काय घडलं?
मामा-भाच्यांमध्ये एकमेकांवर सौम्य टोलेबाजी झाली, पण वाद न वाढवता प्रसंग संपवला.
Q4. चंदगड मार्केट कमिटीबाबत काय निर्णय झाला?
चंदगडमध्ये नव्या बाजार समितीसाठी एकजूट आवश्यक असल्याची मते व्यक्त झाली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.