Shivajirao Patil : शिवाजीराव पाटील जिंकले, पण चर्चा गावातील त्या एका बहुमूल्य मताची!

Shivajirao Patil wins election, village's single precious vote steals limelight: आमदार शिवाजीराव पाटील यांच्या इनाम सावर्डे गावात सध्या ग्रामस्थांना उत्सुकता लागली आहे ती म्हणजे पाटलांच्या विरोधात गेलेला पठ्ठ्या कोण?
shivajirao Patil
shivajirao PatilSarkarnama
Published on
Updated on

Chandgadh Vidhansabha : चंदगड विधानसभा मतदारसंघ राज्याच्या चर्चेचा विषय ठरला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीच्या नऊ जागा निवडून आल्या तर चंदगड मधील अपक्ष शिवाजीराव पाटील निवडून आले. त्यांनी भाजपला पाठिंबा दिला असला तरी चंदगड सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे.

आमदार शिवाजीराव पाटील यांच्या इनाम सावर्डे गावात सध्या ग्रामस्थांना उत्सुकता लागली आहे ती म्हणजे पाटलांच्या विरोधात गेलेला पठ्ठ्या कोण? चंदगड विधानसभा मतदारसंघात 24 हजारांच मताधिक्य घेऊन शिवाजीराव पाटील विजयी झालेत. त्यांच्या गावाने त्यांना चांगलीच साथ दिली आहे.

गावात असणारे 427 मतदानापैकी केवळ एक मत शिवाजीराव पाटलांच्या विरोधात पडले आहे. त्यामुळे उलटं एक मत (कुणी) खल्‍ल रे, असा प्रश्‍न इनाम सावर्डेत विचारला जात आहे. सध्या त्याची पंचक्रोशीत जोरदार चर्चा सुरू आहे.

shivajirao Patil
Parliament Winter Session : एकाच कुटुंबातील तीन खासदार पहिल्यांदाच संसदेत

पुढाऱ्याच्या गावाने साथ दिली की पुढार्‍याचे पुढारपण बहरते. त्यात राजकारण आलं की गावातील गटातटाच्या राजकारणाचा पुढाऱ्याला फटका बसतो. पण गावकडील ते काय करील राव? या म्हणीचा प्रत्यय सध्या चंदगड मधील इनाम सावर्डे गावात आला आहे. पण त्याला एका पठ्यानं थेट गावाच्या विरोधात जाऊन गावच्या पुढार्‍याच्या विरोधात मतदान केले आहे. चंदगड मधील निवडून आलेले आमदार अपक्ष शिवाजीराव पाटील हे इनाम सावर्डेचे आहेत. त्यांच्या गावानं त्यांना ओंजळीत घेतल्याचे दिसते.

इनाम सावर्डे गावाचे असल्याने शिवाजीराव पाटील यांना गावाने भरघोस मतदान दिले. गावात एकूण 427 मतदान झाले. गावचाच उमेदवार असल्याने पाटलांना गावकऱ्यांनी डोक्यावर घेतले. अख्खा चंदगड मतदारसंघ पाटलांसाठी पालथा घातला प्रचार केला.

गावाने पाटलांना साथ दिली. निकालात इनाम सावर्डे तून 427 पैकी 426 मते शिवाजीराव पाटलांना पडली. एकट्या पठ्ठ्याने शिवाजीराव पाटलांच्या विरोधात मतदान केले. वैशिष्ट म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला एक ही मत गावाने दिले नाही. गतवेळीही गावातून 376 पैकी 375 मतदान त्यांना झाले होते.

shivajirao Patil
Top 10 News : 'या' तारखेला महायुती सरकारचा शपथविधी सोहळा? ; CM शिंदेंनी दिला राजीनामा - वाचा महत्त्वाच्या घडामोडी

यावेळी देखील एका पठ्ठ्याने शिवाजीराव पाटील यांच्या विरोधात मतदान केल्याने इनाम सावर्डे ते त्याची चर्चा सुरू आहे. तेच नव्हे तर गावकऱ्यांनी अनेक युक्त्या वापरत त्या विरोधी उमेदवाराचा शोध सुरू केला आहे. मात्र शिवाजीराव पाटलांकडून विरोधी मतदान केलेल्या उमेदवाराचे चिन्ह सिलेंडर टाकी आहे. त्यामुळे एखाद्याचा घोळ असू शकतो. अशी प्रतिक्रिया देत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com