Nandatai Babhulkar
Nandatai BabhulkarSarkarnama

Chandgad Politics : विधानसभा निवडणुकीच्या फेर मतमोजणीत VVPAT चिठ्ठ्या न दाखवल्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या आक्रमक

Nandatai Babhulkar Recounting Controversy : विधानसभा निवडणुकीतील चंदगड विधानसभा मतदारसंघातील मतदानाची फेर मतमोजणी व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार डॉ. नंदाताई बाभुळकर यांनी केली होती.
Published on

Kolhapur News, 25 Jul : विधानसभा निवडणुकीतील चंदगड विधानसभा मतदारसंघातील मतदानाची फेर मतमोजणी व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार डॉ. नंदाताई बाभुळकर यांनी केली होती. त्यानुसार दोन दिवसांपासून फेर मतमोजणी सुरू होती.

या मतमोजणीच्या प्रक्रियेत ईव्हीएमवरील मतमोजणी प्रत्यक्षात दाखवली. मात्र व्हीव्हीपॅटची मतमोजणी दाखवली नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या संदर्भात नंदाताई बाभुळकर यांनी आक्षेप घेतला असून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे या संदर्भात दाद मागणार असल्याचा इशारा त्यांनी सरकारनामाशी बोलताना दिला आहे.

राज्य सरकारकडून विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया ही पारदर्शकपणे झाली असल्याचा दावा करण्यात येत असला तरी, प्रत्यक्ष मतदान झालेल्या व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या न दाखवल्याने डॉ. बाभुळकर यांनी यावर आक्षेप घेतला आहे. फेर पडताळणीत विधानसभा निवडणुकीत झालेले मतदान दाखवले, पण त्याच्या व्हीव्हीपॅट चिठ्ठी दाखवल्या गेल्या नाहीत.

Nandatai Babhulkar
Shivendraraje Bhosale : मंत्रिपदाचा आनंद विरला; शिवेंद्रराजेंच्या बंगल्यावर पैशांसाठी रांगा; 46 हजार कोटी देणे बाकी

फेर मतमोजणीचा अर्ज केल्यानंतर सरकारने आमच्याकडून अडीच लाख रुपये भरून घेतलेत. त्यामुळे चिठ्ठ्या दाखवणे आम्हाला अपेक्षित होते. प्रत्यक्ष ईव्हीएम वरील मतमोजणी पाहिली. हे मतदान जुळलेले असले तरी व्हीव्हीपॅट वरील झालेले मतदान पाहून आम्हाला गैरसमज दूर करायचा होता.

Nandatai Babhulkar
Harshwardhan Sapkal Congress : प्रदेश काँग्रेसच्या जम्बो कार्यकारिणीत जुन्यांना संधी? उफळणाऱ्या नाराजीचा सामना सपकाळांना धक्के देणार?

निवडणुकीत झालेल्या मतदानातील चिठ्ठ्या असताना देखील मी मागणी करून सुद्धा त्या दाखवण्यात आलेल्या नाहीत, असा आरोप डॉ. नंदाताई बाभुळकर यांनी केला. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या मार्फत आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाद मागणार आहोत.

तर प्रसंगी सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचेही बाभुळकर यांनी सांगितलं. उमेदवारांच्या मागणीनुसार सध्या राजाराम तलाव येथील शासकीय गोदामात चंदगड, कोल्हापूर उत्तर मतदार संघातील मशीनची फेरपडताळणी बुधवारपासून सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com