Chandrakant Patil : निलंबत फोंडेंसाठी पालकमंत्र्यांना साकडे; चंद्रकांत पाटील म्हणाले, 'ते कोल्हापूरचे, शिफारस...'

Shaktipeeth highway : ‘शक्तिपीठ’ आंदोलनात सहभागी झाल्याच्या कारणाने कोल्हापूर महानगर पालिकेकडील शिक्षक गिरीश फोंडे यांचे निलंबन करण्यात आले आहे. यावरून राज्यभर संताप व्यक्त केला जातोय. Girish Fonde suspension
Chandrakant Patil On Girish Fonde suspension
Chandrakant Patil On Girish Fonde suspensionsarkarnama
Published on
Updated on

Sangli News : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रिम प्रोजेक्टला विरोध करणाऱ्या शिक्षक गिरीश फोंडे यांना मोठा झटका प्रशासनाने दिला होता. ‘शक्तिपीठ’ आंदोलनात सहभागी झाल्याने त्यांचे निलंबन केले होते. यावरून कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यात रोष व्यक्त केला जातोय. याचमुद्द्यावरून शक्तिपीठ महामार्गविरोधी कृती समितीतर्फे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना इशारा देण्याला होता. तर याबाबत निवेदनही देण्यात आले आहे. हे निवेदन घेताना, पाटील यांनी, महापालिका आयुक्तांना फोंडे यांचे निलंबन रद्द करण्याबाबत शिफारस करू असे आश्वासन दिलं आहे.

कोल्हापूसह राज्यातील 11 जिल्ह्यात ‘शक्तिपीठ’विरोधात आंदोलने केली जातायत. कोल्हापूर जिल्ह्यात गिरीश फोंडे यांनी बाधीत होणाऱ्या शेतकर्यांची मोठ बांधत मुंबईपर्यंत धडक मारली होती. तर थेट राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्यात काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला होता. पण शिंदे यांच्या दौऱ्याच्या आधीच कोल्हापूर महापालिका आयुक्तांनी शिक्षक गिरीश फोंडे यांचे निलंबन केले. यामुळे राज्यात रोष व्यक्त केला जातोय.

यादरम्यान सांगली शक्तिपीठ महामार्गविरोधी कृती समितीतर्फे फोंडे यांचे निलंबन रद्द करा, शक्तिपीठ महामार्ग रद्द करा, अन्यथा पालकमंत्र्यांना काळे झेंडे शक्तिपीठ महामार्गविरोधी कृती समितीतर्फे देण्यात आला होता. त्याची दखल घेत पोलिस अधीक्षक संदीप घुगे, निरीक्षक सुधीर भालेराव यांनी मध्यस्थी करत चर्चा घडवून आणली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत कृती समितीचे उमेश देशमुख, महेश खराडे, उमेश एडके, विष्णू पाटील यांनी पोलिस मुख्यालयात चर्चा करून निवेदन दिले.

Chandrakant Patil On Girish Fonde suspension
Chandrakant Patil : भाजप मंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्ते लोकार्पण; एकाचवेळी पाळणाघर ते एसी शववाहिकापर्यंत...

यावेळी पालकमंत्री पाटील यांनी, कोल्हापूर महापालिका आयुक्तांना पत्र देऊ. तसेच शक्तिपीठ महामार्गाबाबत चर्चा सुरू असल्याचे शिष्टमंडळाला सांगितले. तसेच 'गिरीश फोंडे हे कोल्हापुरचे असून ते परिचयाचे आहेत. ते महापालिकेत शिक्षक असून महामार्गविरोधी आंदोलनात सहभाग घेतल्याबद्दल त्यांना निलंबन करण्यात आले आहे. या संदर्भात कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तांना पत्र देऊन निलंबन रद्द करण्याबाबत शिफारस करू, असे आश्वासन दिले आहे.

Chandrakant Patil On Girish Fonde suspension
chandrakant patil : अजितदादांच्या शिलेदाराच्या भाजप प्रवेशाला चंद्रकांत पाटलांचा ‘ग्रीन सिग्नल’; संजयकाकांच्या घरवापसीचे संकेत

देवस्थान इनाम जमिनीच्या प्रश्नाबाबत चर्चा करताना पालकमंत्री पाटील यांनी, हा राज्यव्यापी प्रश्न निकालात काढण्यासाठी लवकरच राज्याची बैठक घेतली जाणार असल्याचेही सांगितले. तर बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेशाबाबत शासन निर्णय होऊन देखील त्याचा समावेश झालेला नाही. त्या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही, ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर यात लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावू, अशीही ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलिस अधीक्षक संदीप घुगे, महापालिका आयुक्त रविकांत आडसूळ उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com