Chandrakant Patil : भाजप मंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्ते लोकार्पण; एकाचवेळी पाळणाघर ते एसी शववाहिकापर्यंत...

Sangli Zilla Parishad : जिल्हा परिषदेमधील महिला कर्मचाऱ्यांच्या बालकांसाठी पाळणाघर सुरू करण्यात आले आहे. यामुळे आता मुलांच्या संगोपनाच्या ही बाब महत्वाची ठरणार आहे.
Chandrakant Patil
Chandrakant Patilsarkarnama
Published on
Updated on

Sangli News : सध्या उन्हाचा तडाखा वाढला असून याचा फटका सर्व सामान्यांना बसत आहे. लहान बाळांपासून वयोवृद्धांना उष्णतेची दाहकता जाणवत आहे. सध्याच्या असा या 40 डिग्री ओलांडलेल्या तापमानात आपल्या तान्हा बाळांना दुसऱ्याच्या जीवावावर सोडून महिला कर्मचारी कामावर येत आहेत. तर दुसरीकडे उन्हाचा तडाका थेट मृतदेहावर देखील होताना दिसत असल्याने अंतिमसंस्काराचे सोपस्कार लवकर पार पाडावे लागत आहेत. यामुळे लांबून येणाऱ्या नातेवाईंची मात्र निराशा होताना दिसत आहे. पण जे राज्यात कोठेच होणार नाही अशा दोन घटना सांगलीत एकाच वेळी घडल्या आहेत. येथे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी एकाच वेळी तान्ह्या बालकांसाठी पाळणाघर आणि एसी शववाहिकाचे लोकार्पण केल्याने एकच चर्चा सध्या सुरू आहे.

सांगली जिल्हा परिषदेमध्ये महिला कर्मचाऱ्यांच्या बालकांचे संगोपन करण्याच्या उद्देशाने पाळणाघर सुरू करण्यात आले आहे. या पाळणाघरामध्ये लहान मुलांना खेळण्यापासून ते खाण्यापिण्यापर्यंत सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याचबरोबर जिल्हा परिषदेमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचारी या आपल्या मुलांना कामावर आल्यानंतर पाळणा घरात सोडू शकणार आहेत.

कामावरून परत जाताना आपल्या मुलांना घरी घेऊन जाऊ शकतात. त्यामुळे महिला कर्मचाऱ्यांसाठी जिल्हा परिषदेचे हे पाळणाघर अत्यंत सोयीचे आणि मुलांच्या संगोपनाच्या दृष्टीने अत्यंत लाभदायी ठरणार आहे.

Chandrakant Patil
chandrakant patil : अजितदादांच्या शिलेदाराच्या भाजप प्रवेशाला चंद्रकांत पाटलांचा ‘ग्रीन सिग्नल’; संजयकाकांच्या घरवापसीचे संकेत

याचवेळी सांगली जिल्हा परिषदेला तीन एसी शववाहिका प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे आता ग्रामीण भागात एखादे मयत झाल्यास त्याचा मृतदेह एसी गाडीत ठेवता येणार आहे. यामुळे लांबून येणाऱ्या नातेवाईकांना अंतिम संस्कारात भाग घेता येणार आहे. तर एसी शव वाहिका असल्याने मृतदेह जास्तकाळ राहणार आहे. मृतदेह सडू नये यासाठी विशेष व्यवस्था या गाडीमध्ये करण्यात आली आहे.

या एसी शववाहिकेत शव ठेवण्यासाठी बंदिस्त काचेची पेटी असून बाजूला नातेवाईकांना बसण्याची सोय आहे. एखाद्या वेळेस तालुक्याच्या ठिकाणावरून गावापर्यंत अंत्यसंस्कारासाठी शव न्यायचा असेल तर ही एससी शववाहिका फार उपयोगी ठरणार आहे.

Chandrakant Patil
Chandrakant Patil : पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचा मोठा चेहरा भाजप फोडणार? स्वत: चंद्राकांतदादांची खासदाराला ऑफर

एकाच वेळी जिल्हात तान्ह्या बालकांसह मृतदेहासाठी चांगली सोय जिल्ह्यात उपलब्ध झाली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पाळणाघर आणि एसी शव वाहिकेचे लोकार्पण करण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यात सध्या हा विषय चर्चेचा ठरला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com