Chandrakant Patil News : दिल्लीत भाजपकडून 'आप'चा 'करेक्ट कार्यक्रम'; चंद्रकांत पाटलांचा काँग्रेसबाबत सर्वात मोठा दावा

Chandrakant Patil On Delhi Assembly Election Results And INDIA Alliance : संजय राऊत यांना जादूच्या कांडीने रिझल्ट चांगले मिळतात असं वाटत असेल तर त्यांनी पत्रकार परिषद न घेता साधना करावी आणि जादूची कांडी शोधावी. तसेच संंजय राऊत महान नेते आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
Chandrakant Patil
Chandrakant PatilSarkarnama
Published on
Updated on

Delhi News : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि आपसह काँग्रेससह प्रमुख पक्षांनी जोरदार ताकद लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांंच्यासह भाजपनं दिल्लीच्या सतेत्तील कमबॅकसाठी ही निवडणुक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. पक्षसंघटन,उमेदवारांची निवड, अशा विविध पातळींवर प्रचंड मेहनत घेतल्यानं दिल्लीत 27 वर्षानंतर भाजपचं कमळ पुन्हा फुललं आहे. आता याच दमदार विजयानंतर मंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil) इंडिया आघाडीबाबत खळबळजनक दावा केला आहे.

राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात शनिवारी (ता.8) शिवाजी विद्यापीठ येथे एका कार्यक्रमासाठी आल्यानंतर दिल्लीतील निकालावरही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, दिल्लीत इंडिया आघाडीच्या पक्षांना एकत्र यायला कोणी अडवलं होतं? संंजय राऊत महान नेते आहेत. ते काँग्रेस (Congress) आणि आप या दोघांमध्ये समझोता करू शकले असते. पण काँग्रेसला सपोर्ट न करता शिवसेना उबाठा गटाने दिल्लीत आपला सपोर्ट केला. येथेच मोठी ठिणगी पडली आहे. आता त्या आघाडीतून इतरजण बाहेर पडण्यापेक्षा काँग्रेसच बाहेर पडेल, असा दावाही पाटील यांनी केला आहे.

संजय राऊत यांना जादूच्या कांडीने रिझल्ट चांगले मिळतात असं वाटत असेल तर त्यांनी पत्रकार परिषद न घेता साधना करावी आणि जादूची कांडी शोधावी. तसेच संंजय राऊत महान नेते आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

Chandrakant Patil
Kolhapur District Shivsena President : उद्धवसेनेचे तीन शिलेदारांमध्ये जिल्हाध्यक्ष पदासाठी स्पर्धा, कोणावर राहणार ठाकरेंची मर्जी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सर्वसामान्यांचा विश्वास इतका वाढला आहे. त्यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन होऊ दे म्हणजे त्या लोकांचा आणि राज्याचा विकास होणार आहे. याला अपवाद 2024 लोकसभा होती. खोटं नरेटिव्ह सेट करण्यात आला. मात्र, नंतर लोकांना कळालं, गडबड झाली आणि विधानसभेला त्यांनी करेक्ट केलं.

लोकसभेला मिळालेल्या यशानंतर विरोधकांना वाटलं,आता मोदीजींचा करिष्मा संपला. मात्र, मोदीजींचा करिष्मा संपला नाही,आणि संपणारही नाही, असा विश्वास दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने यश मिळवल्यानंतर राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

Chandrakant Patil
Delhi BJP CM Face News : अडीच दशकांहून अधिक काळानंतर दिल्लीत सत्तेवर येणाऱ्या भाजपचा मुख्यमंत्री कोण?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेला दावा फोल ठरला आहे. राहुल गांधी यांनी ड्रेस घेऊन आकडे मांडण्याचा प्रयत्न केला. निवडणूक आयोग यावर उत्तर देणार आहे. कर्नाटकात यश मिळालं की ईव्हीएम चांगला आणि महाराष्ट्रात निकाल लागला की घोटाळा झाला म्हणता, तीच तीच कॅसेट का चालवता. अशा शब्दात मंत्री पाटील यांनी ईव्हीएम वर शंका उपस्थित करणाऱ्यांना ओला लगावला आहे.

भाजपची दोन-तीन जणांची समिती झालेली आहे. प्रत्येकाची नावे तेथे जातील प्रत्येकाचं प्लस मायनस पाहिला जाईल आणि निर्णय घेण्यात येईल. प्रतिक्रिया शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांच्या पक्षप्रवेशासंदर्भात बोलताना ही प्रतिक्रिया मंत्री पाटील यांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com