Kolhapur District Shivsena President : उद्धवसेनेचे तीन शिलेदारांमध्ये जिल्हाध्यक्ष पदासाठी स्पर्धा, कोणावर राहणार ठाकरेंची मर्जी

Ravikiran Ingavale, Harshal Surve, Avadhoot Salunkhe News : विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात ठाकरेंच्या सेनेत नेतृत्व बदलाची मागणी होत आहे.
Harshal Surve, Sanjay Pawar And Ravikiran Ingavale
Harshal Surve, Sanjay Pawar And Ravikiran IngavaleSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात ठाकरेंच्या सेनेत नेतृत्व बदलाची मागणी होत आहे. त्याबाबतच्या हालचालींना देखील वेग आला आहे. एकदा दोन दिवसात जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर कोल्हापुरात येणार आहेत. शिवाय याआधीचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना दोन वर्षांपूर्वी शिवसेनेचे उपनेते केल्यानंतरही जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्याकडेच राहिली आहे. सध्या या पदासाठी कोल्हापूर शहरातील तीन शिलेदार इच्छुक आहेत. प्रत्येकाने आपापल्या परीने फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन पदाधिकाऱ्यांना संधी द्यावी, अशी मागणी शिवसैनिकांकडून केली जात आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात नेहमीच पदाची खांडोळी केली जाते. कोल्हापूर महापालिकेच्या राजकारणात देखील हीच परिस्थिती आहे. पक्षीय पातळीवर देखील पदाची खांडोळी करत कार्यकर्त्याचा सन्मानं राखला जातो. सध्या कोल्हापुरात ठाकरे यांच्या शिवसेनेचे किमान तीन तरी जिल्हाध्यक्ष होत आले आहेत.

राज्यसभा निवडणुकीनंतर संजय पवार यांना सेनेच्या उपनेते पदावर बढती देण्यात आली. त्यानंतर कोल्हापूर शहर करवीर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जिल्हाध्यक्ष पद देखील सध्याही संजय पवार यांच्याकडेच आहे. पण आता नेतृत्व बदल करण्याची मागणी शहराध्यक्ष रविकिरण इंगवले यांनी केली आहे. पक्षातील गटबाजी वारंवार चव्हाट्यावर येत असताना थेट नेतृत्वावर शंका उपस्थित करत इंगवले यांनी मातोश्री पर्यंत निरोप पोहोच केले आहेत.

Harshal Surve, Sanjay Pawar And Ravikiran Ingavale
Shivsena Politics : नेतृत्वावरून कोल्हापूरात ठाकरेंच्या शिवसेनेत ठिणगी, पक्षांतर्गत तक्रारी मुंबईपर्यंत

त्यानंतर पक्षातील नेतृत्व बदलाच्या हालचाली जिल्हास्तरावर गतिमान झाले असून जिल्हाध्यक्ष पदासाठी शहराध्यक्ष रविकिरण इंगवले, युवा सेनेचे माजी जिल्हाप्रमुख हर्षल सुर्वे, उपजिल्हाप्रमुख अवधूत साळुंखे यांच्यात चुरस निर्माण झाली आहे.

Harshal Surve, Sanjay Pawar And Ravikiran Ingavale
Shivsena Politics : ठाकरेंचे 6 खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना उदय सामंतांचा दुजोरा; म्हणाले, "टप्प्याटप्प्याने..."

गाणी देखील या पदावर दावा केला आहे. दरम्यान जिल्हा संघर्ष संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर येत्या काही दिवसात कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे इच्छुकांच्या बाजूचा विचार वरिष्ठ मंडळी करणार का हे पाहणे महत्त्वाचे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com