रोहित पवारांचा खोचक टोला, चंद्रकांतदादांचाही पलटवार; अजित पवारांचं जोरदार प्रत्युत्तर! म्हणाले, 'आम्ही काही...'

Chandrakant Patil responds to Rohit Pawar’s remark And Ajit Pawar gives strong counter : सांगलीत झालेल्या एका कार्यक्रमात राज्यात सत्ता आल्यानंतर महायुतीसह महाविकास आघाडीतील नेते एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी भाजप नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जोरदार राजकीय फटकेबाजी केली.
Ajit Pawar, Rohit Pawar And Chandrakant Patil
Ajit Pawar, Rohit Pawar And Chandrakant Patilsarkarnama
Published on
Updated on

Summary :

  • रोहित पवार यांनी एनडी पाटील सभागृहासाठी 40 लाख देणगी जाहीर केली होती.

  • त्यावर चंद्रकांत पाटील यांनी “मी गिरणी कामगाराचा मुलगा, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही” असा टोला लगावला.

  • अजित पवार यांनी लगेच प्रत्युत्तर देत चंद्रकांत पाटलांवर हल्लाबोल केला.

Sangli News : सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील महात्मा फुले शिक्षण संस्थेचा कार्यक्रमात आज (ता.16) झाला. यावेळी एकाच व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील आणि आमदार रोहित पवार एकत्र होते. या कार्यक्रमात अजित पवार- रोहित पवार आणि त्यानंतर रोहित पवार-चंद्रकांत पाटील यांच्यात कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळाले. चंद्रकांतदादांनी एका मुद्द्यावर थेट काका-पुतण्याचीच फिरकी घेतली. ज्यानंतर अजित पवार यांनीही चंद्रकांत पाटील यांचा चिमटा घेत हा विषय संपवला. यामुळे याची राज्यभर आता चर्चा होताना दिसत आहे.

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रोहित पवार यांची चांगलीच फिरकी घेतली. रोहित पवार यांनी, एनडी पाटील सभागृहाच्या इमारतीला 40 लाखांची देणगी जाहीर केली. त्यांनी, सध्या राज्याच्या तिजोरीच्या चाव्या सत्ताधाऱ्यांकडे आहेत. त्यामुळे चंद्रकांतदादांनी एक शून्य तर अजितदादा दोन शून्य वाढवतील अशी कोटी केली होती.

Ajit Pawar, Rohit Pawar And Chandrakant Patil
Ajit Pawar: दुसऱ्याच्या पक्षांमध्ये नाक खूपसू नका; अजितदादांचा रोहित पवारांना टोला

त्यावरूनच व्यासपीठावरच राजकीय फटखेबाजी पाहायला मिळाली. यावेळी चंद्रकांतदादांनी त्यांच्या भाषणात रोहित पवार यांचे चिमटे काढण्याची संधी दवडली नाही. त्यांनी, रोहित पवारांना चांगलाच टोला लगावताना, रोहित पवार यांनी सांगितलं त्यांच्या आकड्यात मी एक शून्य घालावं. पण मी एक गिरणी कामगाराचा मुलगा. माझे आई वडील दोन्ही गिरणी कामगार. तुमच्यासारखा सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही. माझ्या वडिलांचा महिन्याचा पगार 10 रूपये आणि निवृत्तीच्या वेळी महिन्याला 1400 रूपये मिळत होते. त्यामुळे मी अशी घोषणा करणार नाही. पण सामाजीक काम करण्यासाठी घरदार विकण्याची सवय लागली आहे. पण आता ती वेळ येथे येणार नाही. शासकीय निधी, प्रशासकीय अधिकार हातात आहेत.

एक-दोन शून्यांनी काही होणार नाही. त्यापेक्षा येथे आठ लाख कोटींच्या तिजोरीचा मालक बसलाय. त्यामुळे लागेल जेवढे मागा तेवढे दिले जातील. आता तर खुद्द दादांनीच सूचना केली आहे. अर्धा पार्ट माझ्याकडे आहे. त्याची घोषणा मी करतो, असे म्हणत चंद्रकांतदादांनी रोहित पवारांना टोला लगावला.

अजितदादांना घेतला चिमटा

यावेळी अजित पवारांनीही चंद्रकांत पाटील यांनी सोन्याचा चमचा हे वापरलेल्या शब्दावरून सौम्य भाषेत उत्तर दिले. ते म्हणाले. तुम्ही म्हणालात मी गिरणी कामगाराचा मुद्दा... आम्हीही काही आभाळातून पडलेलो नाही. आम्ही सुध्दा तुमच्या सारख्याच खडतर परिस्थितीमधून पुढे आलो आहोत. फक्त दोन रूम होत्या. मी आणि प्रशांत तर व्हाराड्यांत कधी कधी झोपायचो. त्यामुळे आम्ही काही तोंडात सोन्याच्या चमचा घेऊन जन्माला आलेलो नाहीय. पण रोहितच्या वेळी ही परिस्थीत बदलली ही बाब वेगळी असल्याचेही ते म्हणाले.

Ajit Pawar, Rohit Pawar And Chandrakant Patil
Ajit Pawar : "कुणी कुठे लाइन मारायला गेला तर टायरखाली..." मुलींची छेड काढणाऱ्यांवर अजितदादा संतापले

FAQs :

प्र.1: रोहित पवारांनी किती देणगी जाहीर केली?
उ.1: एनडी पाटील सभागृहासाठी 40 लाखांची देणगी जाहीर केली.

प्र.2: चंद्रकांत पाटलांनी काय विधान केले?
उ.2: “मी गिरणी कामगाराचा मुलगा, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही” असे वक्तव्य केले.

प्र.3: अजित पवारांनी काय प्रतिक्रिया दिली?
उ.3: चंद्रकांत पाटलांच्या विधानाला जोरदार प्रत्युत्तर दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com