

Gokul Election News : 'गोकुळ'च्या निवडणुकीत सर्व जागांवर भाजपने उमेदवार देण्यास हालचाली सुरु केल्याची माहिती आहे. भाजप सर्व जागांवर उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे बोलले जात आहे.
मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी कोल्हापूर मधील एका खाजगी हॉटेलमध्ये भाजप आमदार-खासदार यांच्या सोबत गोकुळ निवडणुकी बाबत चर्चा केली. गोकुळ निवडणुकीसाठी महायुती मध्ये भाजपला सर्वाधिक जागा घ्या, असा आग्रह नेत्यांनी चंद्रकात पाटील यांच्याकडे केला, असे आमदार अमल महाडीक यांनी सांगितले.
दरम्यान, भाजप सर्व 25 जागांवर उमेदवारी अर्ज भरणार असल्याची बोलले जात आहे. दरम्यान, महायुतीमध्ये लढण्याचा निर्णय झाल्यास भाजपच मोठा भाऊ असावा अशी इच्छा नेते व्यक्त करत आहेत. सर्वाधिक जागा भाजपने लढाव्यात यासाठी भाजपचे स्थानिक नेते आग्रही आहेत.
दरम्यान तालुकास्तरावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दूध उत्पादक आणि दूध संस्थाचालकांच्या भूमिका जाणून घेतल्या. जागा वाटपाचा निर्णय अजूनही अंतिम झाला नसल्याने सर्वच जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
अर्ज माघारी पर्यंत अजून दहा दिवस शिल्लक असल्याने या कालावधीत जागा वाटपाचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थिती नंतर जागा वाटपाचा अंतिम निर्णय घेतल्याने ज्या जागा भाजपच्या वाटणीला आले आहेत तेथील अर्ज कायम ठेवून इतर जागांवरील अर्ज माघार घेतले जाणार आहेत असाही निर्णय घेण्यात आला
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.