Satej Patil News : भाजप नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या, काँग्रेस नेते सतेज पाटलांच्या मनात नेमकं काय?

Gokul Milk Union election: मुश्रीफ विरुद्ध महाडिक गटाच्या वादात भाजप नेत्यांना जवळ करत सतेज पाटील आघाडी साधणार की महायुतीत नवे फाटे पडणार, गोकुळच्या राजकारणात कुतूहल.
Congress MLA Satej Patil met BJP rural district chief Rajvardhan Naik Nimbalkar
Congress MLA Satej Patil met BJP rural district chief Rajvardhan Naik Nimbalkarsarkarnama
Published on
Updated on

Gokul election Kolhapur : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी गाठीभेटी सुरू केल्या आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून गोकुळमध्ये सुरू असलेल्या महायुतीमधील अंतर्गत राजकारणामुळे आणि कुरघोडीमुळे निवडणुकीचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

मंत्री हसन मुश्रीफ गट, शिवसेना, जनसुराज्य विरुद्ध महाडिक गट असा सुप्त संघर्ष गोकुळ निवडणुकीच्या प्रक्रियेच्या पावला पावलावर होत आहे. अशातच महाविकास आघाडी कडून एकटे काँग्रेसचे नेते सतेज पाटील हे निवडणुकीच्या प्रचारानिमित्त रान उठवत आहेत. महायुतीमध्ये एकटे पडलेल्या भाजप नेत्यांच्या गाठीभेटी घेण्याचा धडाका आमदार सतेज पाटील यांनी लावला आहे. त्यामुळे गोकुळच्या राजकारणात नवी समीकरणे उदयाला येणार की काय अशी चर्चा रंगू लागली आहे.

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी सुरू ठेवल्या आहेत. संस्था सभासद आणि ठराव धारकांच्या गाठीभेटी घेत असताना खास करून भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार गाठीभेटी सुरू ठेवल्या आहेत. यामध्ये ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, आमदार शिवाजीराव पाटील, माजी मंत्री भरमू अण्णा पाटील यांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत.

Congress MLA Satej Patil met BJP rural district chief Rajvardhan Naik Nimbalkar
CM Vijay news : विजय यांनी मुख्यमंत्र्यांची खुर्ची सोडली अन् मंत्र्यांच्या जागेवर बसले! विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं...

गोकुळ दूध संघाचे संचालक आणि सतेज पाटील यांचे निकटवर्तीय शशिकांत पाटील चुयेकर यांनी देखील जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील यांची भेट घेतली आहे. यातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे हे तिघेही महाडिक गटाबरोबर अत्यंत निकटवर्तीय आहेत. आणि दुसरा प्रमुख धागा म्हणजे या तिघांनीही गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून मंत्री हसन मुश्रीफ गटावर आरोप केले आहेत. त्यामुळे तिघांची ही घेतलेली भेट ही गोकुळच्या राजकीय पटलावर महत्त्वाची समजली जाते.

भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी पुणे येथील भोर जिल्ह्यातील किकवी प्रोजेक्ट वरून मंत्री मुश्रीफ गटाला धारेवर धरले आहे. मंत्री हसन मुश्रीफ हे सातत्याने आमदार सतेज पाटील यांना गोकुळच्या राजकारणावरून डिवचताना दिसत आहेत. मात्र अद्याप पाटील यांनी मंत्री मुश्रीफ यांच्या बद्दल ब्र सुद्धा काढलेला नाही. मात्र मुश्रीफ गटावर टीका करणाऱ्या सर्वच नेत्यांची भेट आमदार सतेज पाटील का घेत आहेत याचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहेत.

Congress MLA Satej Patil met BJP rural district chief Rajvardhan Naik Nimbalkar
Gokul Election : गोकुळच्या निवडणुकीत धक्कादायक घडामोडी! सतेज पाटलांनी घेतली भाजप जिल्हाध्यक्षांची भेट; कोल्हापुरच्या राजकारणात मोठा ट्विस्ट

सध्या गोकुळ दूध संघाची निवडणूक ही महायुती म्हणून लढण्यास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर दबाव आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच मंत्री हसन मुश्रीफ यांनी महायुती म्हणूनच लढणार असे स्पष्ट केले आहे. मात्र दुसरीकडे भाजपच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना अप्रत्यक्षपणे जिथून निवडून याल तिथं स्वातंत्र्य दिलं असल्याचं बोलले जात आहे. तर अंतर्गत कुरघोडीमुळे महायुती मधील घटक पक्ष देखील भाजपवर नाराज आहेत. त्यातूनच एका पक्षातील बडा नेता आणि आमदार हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शिवसेना जनसुराज्य शक्ती आणि राष्ट्रवादी काँग्रेसला युती म्हणून लढण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती केली आहे.

कदाचित याचीच माहिती, आमदार सतेज पाटील यांना असावी. तर गेल्या तीन महिन्यांपासून आमदार शिवाजी पाटील हे देखील गोकुळच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत. सातत्याने मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीकास्त्र सोडले जात आहे. आजवर चंदगडला गोकुळ सारख्या संस्थेत न्याय मिळालेला. हीच भूमिका घेऊन आमदार शिवाजी पाटील यांनी गोकुळच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका घेतली आहे.

Congress MLA Satej Patil met BJP rural district chief Rajvardhan Naik Nimbalkar
तब्बल अर्धा कोटी फॉलोअर्स, पण तुकाराम मुंढे सोशल मीडियात एकाच नेत्याला करतात फॉलो...

कोणत्याही परिस्थितीत चंदगडला अध्यक्षपद मिळावे, यासाठी आमदार पाटील प्रयत्न करत आहेत. मात्र शिवाजीराव पाटील यांना महायुतीच्या बैठकीत आमंत्रण नसल्यामुळे ते देखील नाराज आहेत. अशा परिस्थितीत सतेज पाटील यांनी शिवाजी पाटील यांची भेट घेऊन बंद दाराआड चर्चा केली.नाराज असलेल्या शिवाजी पाटील यांना सोबत घेऊन आमदार सतेज पाटील निवडणुकीत आघाडी घेण्याचा प्रयत्न आहे कां? त्यामुळे आगामी पंधरा दिवसात धक्कादायक आघाडी आणि समीकरणे जुळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि महाडिक गटाचे अत्यंत निकटवर्तीय तानाजी पाटील यांनी देखील गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोकुळ मधील तत्कालीन सत्ताधाऱ्यांवर आरोप केले होते. गोकुळ संदर्भातील विविध विकासकामे, पशुखाद्य औषध विक्री आणि वाहतुकीतील अनेक कामा संदर्भात खुलासे करू असा इशारा दिला होता. त्यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नवीद मुश्रीफ हे गोकुळचे अध्यक्ष होते. त्यामुळे सहाजिकच आमदार सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी तानाजी पाटील यांची भेट घेत गोकुळच्या निवडणुकीच्या निमित्ताने बोलणी केली आहे.

एकीकडे महायुती मधील असलेला संघर्ष, आणि त्यातूनच भाजपला वगळून सुरू असलेला इतर पक्षांचा डाव जगजाहीर आहे. त्याचाच फायदा आमदार सतेज पाटील हे या निवडणुकीच्या निमित्ताने उचलणार काय? त्याच दृष्टीने सतेज पाटील यांनी भाजप नेत्यांच्या भेटीचा धडाका सुरू ठेवला आहे की काय? याचे उत्तर येत्या पंधरा दिवसात स्पष्ट होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com