Sangli News, 16 Mar : काँग्रेसमधून बंडखोरी करत प्रचंड बहुमताने विजयी झालेले सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी भाजपमध्ये यावं अशी खुली ऑफर भाजप नेते तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली आहे.
त्यांच्या या ऑफरमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. शिवाय विशाल पाटील आता खरंच भाजपमध्ये (BJP) जाणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अशातच आता चंद्रकांत पाटलांनी दिलेल्या ऑफरवर आता खासदार विशाल पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. चंद्रकांतदादांना माझ्या कामाची पद्धत आवडली असेल, म्हणून ते ऑफर देत असतील असं खासदार पाटील यांनी म्हटलं आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, राजकारणात नेहमी वर्तमानात चालावं लागतं. "वर्तमानात त्यांच्याकडे अजून चार वर्षे २ महिन्यांचा कालावधी आहे. या कालावधीचा आम्ही विचार करतो. जर ते बरोबर आले तर आमची केंद्रातील एक संख्या वाढेल आणि जिल्ह्यातल्या विकासकामांना त्यांना जे करायचे आहे.
ते देखील सोपं जाईल. म्हणून त्यांना ही जाहीर ऑफर पुन्हा देतोय. त्याचा त्यांनी विचार करावा." तर चंद्रकांत पाटील हे बोलत असतानाच विशाल पाटील यांनीही पुढे काय होईल माहीती नाही, असं म्हटल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे.
मात्र, या ऑफरवर खासदार विशाल पाटील यांनी सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले, मी ज्या पद्धतीने संसदेत प्रश्न मांडतोय, ही माझ्या कामाची पद्धत चंद्रकांतदादांना आवडली असेल. मला सतत भाजप प्रवेशाची ऑफर येत असेल तर मी चांगलं काम करतोय असं मी समजतो.
पण भाजपमध्ये प्रवेशाबाबत मी कोणताही विचार करत नाही. मी आता कायद्यानेच दुसऱ्या कोणत्याही पक्षात जाऊ शकत नाही. सर्व पक्ष गट तट बाजूला ठेवून सांगलीच्या विकासासाठी विचार करणं हेच माझं धोरण आहे, असं म्हणत त्यांनी भाजपसोबत जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
विशाल पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपचे संजय काका पाटील आणि महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील यांचा दारूण पराभव केला. या निवडणुकीत त्यांना 1 लाख 53 हजार मते मिळाली.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.