Ravi Rana News : रवी राणांमुळे भाजपात असंतोष, बंडखोरी अटळ!

Badnera Assembly constituency : रवी राणा बडनेराचे आमदार आहेत. आजवर ते स्वबळावर निवडून येत होते. यावेळी मात्र त्यांना भाजपने उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये चांगलाच असंतोष उफाळून आला आहे.
 Ravi Rana Devendra fadanvis
Ravi Rana Devendra fadanvissarkarnama
Published on
Updated on

Assembly Election : लोकसभेच्या निवडणुकीत माजी खासदार नवनीत राणा यांची उमेदवारी लादल्याने भाजपमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला होता. त्याचे परिणाम भाजपला भोगावे लागले. हा इतिहास ताजा असताना आता बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या उमेदवारीवरून नव्या वाद उफाळून आला आहे. राणा यांना उमेदवारी दिल्यास भाजपमध्ये बंडखोरी अटळ मानली जाते आहे. तसा इशार देखील पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

रामटेकमध्ये शिंदे सेनेचे आमदार आशिष जयस्वाल यांच्या विरोधात जाहीर भूमिका मांडणारे भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. पक्षशिस्त मोडणारे व बंडखोरीची भाषा करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे.आता ते बडनेरा विधानसभा मतदारसंघात कोणावर कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रवी राणा बडनेराचे आमदार आहेत. आजवर ते स्वबळावर निवडून येत होते. यावेळी मात्र त्यांना भाजपने उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये चांगलाच असंतोष उफाळून आला आहे. आमदार, खासदार बाहेरच्यांना बनवायाचे आम्ही त्यांच्या सतरंच्या उचालायच्या का? असा त्यांचा सवाल आहे.

रवी राणा यांना महायुतीतून उमेदवारी देण्यात येणार असल्याचे बघून भाजप नेते तुषार भारतीय निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले. बडनेरा मतदारसंघात त्यांनी आपले कार्यालयसुद्धा सुरू केले आहे. त्यामुळे आमदार रवी राणा यांनी तुषार भारतीय आणि आमदार श्रीकांत भारतीय यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी भाजप नेत्यांकडे केली आहे.

 Ravi Rana Devendra fadanvis
Parinay Phuke : परिणय फुकेंनी वडेट्टीवारांना पकडले कात्रीत; म्हणाले, मंत्री असताना ओबीसींसाठी काय केले?

पक्षाच्या बाहेरचे असलेले रवी राणा हे आमच्या नेत्यांवर कारवाईची मागणी कशी करू शकतात, असा सवाल स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा आहे. रवी राणा यांनी कोणतीही विकास कामे केली नाही. आमिष दाखवून आजवर मते घेतली. सोयीसाठी त्यांनी काँग्रेस तर कधी राष्ट्रवादीच्या नेत्यांशी सलगी केली. यावेळी त्यांना पराभव दिसत असल्याने आता भाजप नेत्यांच्या घरी चकरा मारत आहेत.

रवी राणा यांना महायुतीची उमेदवारी दिली जाणार असेल तर बडनेरा विधानसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार उभा राहील व तो विजयी होईल, असा दावा माजी महापौर चेतन गांवडे व भाजपचे महामंत्री प्रशांत शेगोकार यांनी केला.

नवनीत राणांना नाराजी फटका

नवनीत राणा या अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार होत्या. त्या अपक्ष लढल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यांना पाठिंबा होता. २०१४ च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यावेळीसुद्धा भाजपात मोठी नाराजी निर्माण झाली होती. त्यावेळीसुद्धा भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नवनीत राणा यांचे काम करणार नाही, असे जाहीर केले होते. भाजपच्या नाराजीचा फटका नवनीत राणा यांना बसला. त्या पराभूत झाल्या. बाहेरचा उमेदवार लादल्यास काय होते हे भाजपच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिले. असे असतानाही रवी राणा यांना उमेदवारी दिली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले.

 Ravi Rana Devendra fadanvis
MLA Sanjay Shirsat News : सरकारने मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेतले, जरांगे पाटलांनी आमच्या पाठीशी उभे राहावे..

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com