Chhatrapti Sambhjiraje News : 'मुंबई, दिल्लीला न जाता...'; संभाजीराजेंची शाहू महाराजांसाठी खास पोस्ट

Political News : कोल्हापूर मतदारसंघातून शाहू महाराजांना उमेदवारी जाहीर झाली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांचे चिरंजीव संभाजीराजे छत्रपतींनी केलेली खास पोस्ट चर्चेत आली आहे.
Chhatrapati Shahu Maharaj-Sambaji Raje
Chhatrapati Shahu Maharaj-Sambaji RajeSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राज्यातील वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीतील जागावाटप रखडले असले तरी काँग्रेसने त्यांच्या वाट्याच्या जागावरील उमेदवारांची घोषणा केली आहे. या यादीत कोल्हापूर मतदारसंघातून शाहू छत्रपती महाराजांना उमेदवारी जाहीर झाली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांचे चिरंजीव संभाजीराजे छत्रपती यांनी केलेली खास पोस्ट चर्चेत आली आहे.

या पोस्टमध्ये छत्रपती संभाजीराजेंनी मुंबई दिल्लीला न जाता, कुठल्याही नेत्याकडे तिकीटाची मागणी न करता उमेदवारी दिली असल्याचे स्पष्ट करीत. केवळ लोकभावना पाहून महाविकास आघाडीतील तीन घटक पक्षांनी एकत्र येत महाराजांना लोकसभा लढण्याची विनंती केली. त्यांनी ही विनंती मान्य करीत जनसेवेचे कार्य हाती घेतल्याचे म्हटले आहे.

काही दिवसापूर्वीच संभाजीराजे छत्रपती यांनी शाहू महाराजांसोबतच फोटो शेअर करीत त्यांच्या उमेदवारीच्या चर्चेला दुजोरा दिला होता. (Kolhapur Lok Sabha News)

Chhatrapati Shahu Maharaj-Sambaji Raje
Parbhani Loksabha Constituency : परभणी भाजपमध्ये चाललंय काय, बोर्डीकरांना टाळून बैठक?

गेले तीन दिवस शाहू महाराजांच्या प्रचारार्थ मी राधानगरी तालुक्याच्या दौऱ्यावर होतो. सह्याद्रीच्या डोंगररांगांनी वेढलेल्या, निर्भीड अरण्यात वसलेल्या "वाकीघोल" या अत्यंत दुर्गम भागात माझा दौरा होता. परवा रात्री मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर मोबाईलला थोडी रेंज आली आणि शाहू महाराजांना उमेदवारी जाहीर झाल्याची बातमी दिसली. मन आनंदून गेले. लागलीच कोल्हापूरला जाऊन महाराजांना भेटण्याची इच्छा झाली. पण लगेचच जबाबदारीचीही जाणीव झाली. हातातले काम... पुढे दिलेला शब्द.... आणि पुढचा नियोजित दौरा पूर्ण करूनच कोल्हापूरला निघायचे ठरवले. शनिवारी हा दौरा संपवून घरी आल्यानंतर लगेचच महाराजांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.

खरेतर तिकीटासाठी एकदाही मुंबई दिल्लीला न जाता, कुठल्याही नेत्याकडे तिकीटाची मागणी न करता, केवळ लोकभावना पाहून तीन पक्षांनी एकत्र येत महाराजांना लोकसभा लढण्याची विनंती केली. महाराजांनी आयुष्यभर राजकारणापासून व प्रसिद्धीपासून अलिप्त राहत जे जनसेवेचे कार्य केले आहे.

राजघराण्याची झूल न पांघरता लोकशाहीचा पुरस्कार करण्याची जी भूमिका आयुष्यभर जपली आहे, त्याचेच हे प्रमाण आहे. कोल्हापूरची जनता ठामपणे महाराजांसोबत उभी आहे. ही लोकभावनाच महाराजांच्या विजयाची शाश्वती असल्याचे, त्यांनी सोशल मिडियावर केलेल्या पोस्टमध्ये संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट केले आहे.

प्रचाराची एक फेरी पूर्ण

लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी शाहू महाराजांच्या (Shahu Maharaj) प्रचाराला सुरुवात केली आहे. कोल्हापूर मतदारसंघातील (Kolhapur Lok Sabha News) विविध गावांना देत त्यांनी आतापर्यंत प्रचाराची एक फेरी पूर्ण केली आहे. त्यामुळे प्रचारात त्यांनी आघाडी घेतल्याची चर्चा सुरु आहे.

Chhatrapati Shahu Maharaj-Sambaji Raje
Sambhajiraje Chhatrapati News : 'स्वराज्य'चं लोकसभेचं गणित बिघडलं, कोल्हापूरच्या जागेमुळे स्वप्न भंगलं

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com