Sambhajiraje Chhatrapati News : 'स्वराज्य'चं लोकसभेचं गणित बिघडलं, कोल्हापूरच्या जागेमुळे स्वप्न भंगलं

Sambhajiraje Chhatrapati Swarajya Party : 'स्वराज्य' पक्षानं लोकसभेला महाविकास आघाडीला साथ दिली असतील, तर विधानसभेला...
Sambhajiraje Chhatrapati
Sambhajiraje Chhatrapati sarkaranama
Published on
Updated on

गेल्या दीड वर्षापासून 'स्वराज्य' पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती ( Sambhajiraje Chhatrapati ) यांनी लोकसभेच्या मैदानात शड्डू ठोकणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, कोल्हापुरातून वडील शाहू महाराज छत्रपती ( Shahu Chhatrapati ) यांचे नाव महाविकास आघाडीतून समोर आल्यानंतर संभाजीराजे यांचे आणि 'स्वराज्य' पक्षाचे लोकसभेचे स्वप्न भंगले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत 'स्वराज्य' या लोकसभा निवडणुकीपासून अलिप्त राहणार आहे. स्वतः संभाजीराजे छत्रपती यांनी याबाबतची घोषणा केल्यानंतर कोल्हापूर वगळता राज्यातील कार्यकर्ते बुचकळ्यात पडले आहेत.

Sambhajiraje Chhatrapati
Modi- Shah Politics : आमदार फोडले, पक्ष बळकावले; तरीही सत्ताधाऱ्यांना ठाकरे - पवारांचा धसका...?

युवराज संभाजीराजे छत्रपती ( Sambhajiraje Chhatrapati ) यांचा सर्वाधिक प्रभाव नाशिक आणि मराठावाड्यात आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात संभाजीराजे छत्रपती यांचा राज्यभरात झालेला दौरा आणि त्यातून मिळालेली ताकद यामुळे 'स्वराज्य' पक्ष स्थापन केला. त्यामुळे मराठवाड्यात आणि विदर्भात संभाजीराजे छत्रपती यांना मानणारा वेगळा गट आहे. अशा परिस्थितीत कोल्हापुरातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा संकल्प संभाजीराजे छत्रपती यांचा होता. संभाजीराजे छत्रपती यांच्या कोल्हापुरातील कार्यकर्त्यांनी मेळावा घेत त्यांनी लोकसभा निवडणूक लढवावी, असा आग्रह धरला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपकडून राष्ट्रपती कोट्यातून मिळालेल्या खासदारकीचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी राज्यसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार केला होता. पण, त्यावेळी त्यांच्यावर माघार घेण्याची वेळ आली. अशा स्थितीत महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर लोकसभा निवडणूक लढवून विजयी होत, राज्यात 'स्वराज्य' पक्ष उभा करण्याची भूमिका संभाजीराजे छत्रपती यांची होती. कोल्हापुरातून संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा होती. पण, 'स्वराज्य' पक्षातूनच निवडणूक लढण्यावर संभाजीराजे छत्रपती ठाम होते. त्यामुळे महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती यांचं नाव समोर आलं. त्यामुळे दुसऱ्यांदा माघार घेण्याची वेळ त्यांच्यावर आली.

Sambhajiraje Chhatrapati
BJP Gain : अमित शाह यांचा शह ! ; शिंदे, पवार नमते घेतील काय ?

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शाहू महाराज छत्रपती यांचे नाव निश्चित झाल्याचे समजते. मात्र, कौटुंबिक जबाबदारी लक्षात घेऊन संभाजीराजे छत्रपती यांनी वडिलांच्या विजयासाठी जीवाचं रान करण्याचे ठरविले आहे. माझ्या निवडणुकीला मी 100% उतरलो असतो, तर आता वडिलांच्या निवडणुकीत मी 1000% रिंगणात उतरणार. अशी भूमिका संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट केली आहे. पण, या निवडणुकीत 'स्वराज्य' पक्षाची भूमिका काहीच नसणार. शिवाय कोल्हापुरात प्रचार करत असताना मी 'स्वराज्य' पक्षाचा उल्लेख करणार नसल्याची भूमिका संभाजीराजे छत्रपती यांची आहे. शिवाय राज्यात ही स्वराज्यची भूमिका अलिप्त असेल असंही मत आहे.

Sambhajiraje Chhatrapati
Lok Sabha Election 2024 News : महायुती, महाविकास आघाडीतील इच्छुक, समर्थकांची धडधड वाढली

एकीकडे संभाजीराजे छत्रपती यांची भूमिका ठरली आहे. तसेच, 'स्वराज्य' पक्षाची भूमिका लोकसभा निवडणुकीत काय असणार हे देखील स्पष्ट केले आहे. 'स्वराज्य'नं लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला साथ दिली असती, तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत निश्चितच पक्षाला किमान दोन ते तीन जागा आल्या असत्या, असं राजकीय जाणकरांचे मत आहे. पण, 'स्वराज्य'ची भूमिका लोकसभा निवडणुकीत ठाम नसल्यानं त्याचा फटका विधानसभा निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे.

Sambhajiraje Chhatrapati
Sunil Shelke News : आमदार शेळकेंच्या नथीतून 'साहेबां'चा अजितदादांवर निशाणा !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com