CM Fadnavis Announcement : पंढरपूर कॉरिडॉरसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून ‘स्पेशल पॅकेज’ची घोषणा

Pandharpur Corridor : मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंढरपूर कॉरिडॉर काम यंदाच सुरू होणार असल्याची घोषणा केली. कोणीही विस्थापित होणार नाही, सर्वांना पुनर्वसन व विशेष पॅकेज दिले जाईल, असे स्पष्ट केले.
CM Devendra Fadnavis
CM Devendra Fadnavis Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 28 April : पंढरपूर कॉरिडॉरचे काम याच वर्षी सुरू होणार आहे. अनेक जण शंका कुशंका उपस्थित करून जनतेला घाबरविण्याचे काम करत आहेत. पंढरपूर कॉरिडॉरमुळे कोणालाही विस्थापित केले जाणार नाही. ज्याचं दुकान जाईल, त्याला दुकान दिलं जाईल. कुठल्याही योजनेत बसत नाहीत, अशांसाठी ‘स्पेशल पॅकेज’ देऊन त्यांचेही पुनर्वसन करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

पंढरपूर कॉरिडॉर हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे, त्यामुळे सोलापूर दौऱ्यावर आल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यावर भाष्य केले. भाजपचे नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी कॉरिडरवर भाष्य केले.

ते म्हणाले, पंढरपूर कॉरिडॉर झाल्यानंतर पांडुरंगाच्या कृपेने व्यापाऱ्यांचा व्यवसाय हा दहापट नाही तर झाला माझे नाव बदला. केवळ आषाढी, कार्तिकी आणि इतर एकादशीलाच नव्हे तर लाखो लोक रोज पंढरपुरात येऊ इच्छितात. पण व्यवस्था नसल्याने ते येऊ शकत नाहीत. भव्यदिव्य कॉरिडॉरमुळे केवळ पंढरपूरची नव्हे सोलापूर जिल्ह्याची अर्थव्यवस्थाच बदलून जाईल.

नवी वाढवण बंदराशी सोलापूरचा थेट कनेक्ट होणार आहे. सोलापुरात धार्मिक पर्यटनाला मोठ्या प्रमाणात वाव राहणार आहे. कारण, अक्कलोट, पंढरपूर, तुळजापूर, गाणगापूर अशी तीर्थक्षेत्रे या परिसरात आहेत. संपूर्ण महाराष्ट्राची अध्यात्मक शक्तीच या पंचक्रोशीत आहे. या परिसराचा आशीवार्द मिळणे, हे माझं भाग्य आहे, असेही फडणवीस म्हणाले.

CM Devendra Fadnavis
Ranjitsinh Mohite Patil : फडणवीसांच्या सोलापुरातील कार्यक्रमास रणजितसिंह मोहिते पाटलांची दांडी; कारणही आले पुढे...

भाजपला तुफान अन्‌ ऊनही थांबवू शकत नाही

फडणवीस म्हणाले, सोलापूरच्या जनतेने भाजपवर टाकलेला विश्वास वाया जाणार नाही. जनतेच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आम्ही दिवसरात्र मेहनत करू. आपले निवडून आलेले नवे पदाधिकारी पारदर्शक काम करतील, असे सांगून भाजपला तुफान आणि ऊनही थांबवू शकत नाही, हे तुम्ही आजच्या उपस्थितीतून दाखवून दिलं आहे.

सोलापुरात लवकरच आधुनिक रेडिमेड गारमेंट पार्क

सोलापूर शहरात लवकरच आधुनिक रेडिमेड गारमेंट उभारण्यात येईल. तसेच, पाच वर्षांनी शहरात मतं मागायला जाऊ, तेव्हा प्रत्येक सोलापूरकरांच्या घरात दररोज पाणी आलेलं असेल. तसेच, कामगारांच्या तेरा चाळी आणि सोसायट्या ह्या फ्री होल्ड (टॅक्स) करणार आहे. नवी मुंबई विमानतळावर ऑपरेटर मागेल तो सॉल्ट उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी असणार आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

CM Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : फडणवीसांचा इशारा : 'हा देवाभाऊ प्रत्येक गोष्टीत तुमच्या पाठीशी राहील; पण चुकीला माफी नाही...'

बसवेश्वर स्मारकासाठी निधी देणार

मुख्यमंत्री म्हणाले, मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक उभारण्यासाठी जो निधी लागेल, तो तत्काळ उपलब्ध करून देण्यात येईल. महात्मा बसवेश्वरांचं अत्यंत सुंदर असं स्मारक उभारण्यात येईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com