Malvan : आगामी विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. निवडणुका जवळ आल्या की पक्ष फोडाफोडीचे राजकारण सुरू होते. सध्या फोडाफोडीच्या राजकारणाची चर्चा कोकणात रंगत आहेत.
मालवणमधील दांडी येथील माजी नगरसेवक पंकज सादये यांनी दोन दिवसांपूर्वी ठाकरे गट सोडून भाजपामध्ये प्रवेश केला. तर ठाकरे गटाने दोन दिवसात भाजपचे, राणे समर्थक तीन माजी नगरसेवक फोडले.
मालवणमधील पंकज सादये यांनी भाजपात प्रवेश केला होता, त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असे चित्र होते, त्यानंतर ठाकरे गटानेही एक पाऊल पुढे जात भाजपाचे माजी नगरसेवक लीलाधर पराडकर, संतोष उर्फ बाबू कांदळकर, संतोषी कांदळकर आणि भाजपाच्या वार्ड अध्यक्षा अंजली पराडकर यांना ठाकरे गटात घेतले. या प्रवेशामुळे भाजपाला मोठा धक्का बसला आहे.
या तिघांमुळे ही आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला फायदा होणार आहे. आमदार वैभव नाईक आणि संदेश पारकर यांच्या उपस्थितीत हे प्रवेश झाले. "ठाकरे गटाकडे सत्ता नाही, पक्ष नाही, चिन्हही नाही तरीही ठाकरे गटावर लोक विश्वास ठेवून प्रवेश करत आहेत, या सर्वांचा योग्य सन्मान ठेवू," असे वैभव नाईक यांनी सांगितले.
Edited By : Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.