Ajit Pawar : 'विठ्ठलाच्या साक्षीने सांगतो, आम्ही सत्तेत आल्यास पुढची पाच वर्षे लाडकी बहीण योजना सुरू राहील'

CM Ladki Bahin Yojana : काँग्रेसच्या एका माजी मंत्र्यानं सांगितलं की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद करू. पण, महिलांना पैसे मिळतात, हे त्यांना बघवतच नाही. त्यामुळे विरोधक सत्तेत आले की ही योजना बंद करतील.
Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 08 October : काँग्रेसच्या एका माजी मंत्र्यानं सांगितलं की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद करू. पण, महिलांना पैसे मिळतात, हे त्यांना बघवतच नाही. त्यामुळे विरोधक सत्तेत आले की ही योजना बंद करतील. विठ्ठलाच्या साक्षीने सांगतो आम्ही सत्तेत आलो की, पुढचे पाच वर्षे योजना सुरू राहील, त्यामुळेच तुम्ही विचार करा आणि त्यांना (महाविकास आघाडी) सत्तेत आणून योजना बंद पडायची की आम्हाला सत्तेत आणून योजना सुरु ठेवायची, असे भावनिक आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना केले.

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा (CM Ladki bahin yojana) वचनपूर्ती सोहळा मंगळवारी सोलापुरात पार पडला. त्या वचनपूर्ती सोहळ्याच्या सभेत उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री येणार होते. मात्र, त्यांच्या डोळ्याची शस्त्रक्रिया झाल्याने ते कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत, त्यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वचनपूर्ती सोहळा पार पडला.

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे आमच्या बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद आहे. या योजनेमुळे सरकारबद्दल आदरचं स्थान निर्माण झालेलं आहे. रक्षाबंधनला पैसे अकाउंटला जमा झालेत आणि आता भाऊबीजेचे पैसेही आताच आम्ही जमा करणार आहोत. देवेंद्र आणि मी दोघांनीही अर्थसंकल्प सादर केलेले आहेत, महिलांना सक्षम करायचं आहे.

काही जण म्हणाले, पैसे खात्यातून काढून घेतील. अरे कुठला भाऊ ओवाळणी परत काढून घेतो का रे शहाण्यानो.महायुती सरकारने सुरू केलेल्या या सर्व योजना सुरु राहिल्या पाहिजे, ही आमची इच्छा आहे. आम्हाला काही जण म्हणाले की फक्त बहिणींना देता, भावांकडे लक्ष देत नाहीत. आम्ही त्यांच्याकडेही लक्ष दिलंय, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचे धोरण सरकारने स्वीकारले आहे. आता सध्या दिवसा आणि रात्री वीज दिली जात आहे. पण, शेतकऱ्यांना येत्या सहा महिन्यांत दिवसा वीज देण्याचा आमचा संकल्प आहे. बळिराजासाठी आम्ही 7.5 एचपी मोटारचे बिलं माफ केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं आणि आमच्या हिंमत होती, आम्ही हे बिलं माफ केले. शून्य रुपयाचे बिलं शेतकऱ्यांना दिले आहे. कोट्यवधी रुपयांचे वीजबिलं आम्ही माफ केले आहे.

Ajit Pawar
Dhanraj Shinde : दोन भाऊ एकत्र; मात्र पुतण्याचा बबनदादा शिंदेंविरोधात बंडाचा झेंडा कायम...

सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना वीज बिलं माफी करू म्हणाले. एक बिलं शून्य रुपयाचे दिलंही. मात्र, पुढच्या निवडणुकीत विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले आणि म्हणाले ही योजना सरकारला परवडणार नाही. त्यानंतर 2004 पासून पुन्हा एकदा बिलं द्यायला सुरुवात केली. उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस इथं आहेत, त्यांच्यासमोर सांगतो आम्ही दिलेली वीजबिलं माफी ही औटघटकेची नाही. आम्ही त्यांच्यासारखे नाही, असेही अजित पवार यांनी नमूद केले.

अरे शहाण्या अर्थमंत्री तू आहे का मी?

ते म्हणाले, आम्ही एकदा योजना जाहीर केली की, मागे हटणारे नाही. सरकारकडे पैसे नाहीत, असंही काहीजण म्हणाले. अरे शहाण्या अर्थमंत्री तू आहे का मी? लोकांची दिशाभूल करण्याचे काम हे लोक करतात. संविधान बदलणार, घटना बदलणार अशी निव्वळ अफ़वा पसरवली त्याची किमंत आम्ही मोजली

खोटं बोल;पण रेटून बोल

जम्मू काश्मीर आणि हरियाणाची मतमोजणी सुरु असतानाच. काँग्रेसवाले गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत. पण, हरियाणामध्ये काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. खोटं बोल पण रेटून बोल असं त्यांचं सुरू आहे. पण, लोकसभेसारखं बळी पडू नका, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले.

आता जबाबदारी तुमची

होमगार्ड, अंगणवाडी सेविका या सर्वांचे मानधन वाढवले आहेत. सर्व समाजातील घटकांना न्याय द्यायचं कामे केलंय. आम्ही आमचं काम केलंय, पण आता जबाबदारी तुमची आहे. तुम्ही आम्हाला संधी दिली की आम्ही दिल्लीत जाऊन निधी आणू. आम्हाला नरेंद्र मोदी नाही म्हणणार नाहीत पण, विरोधक सत्तेत आले को त्यांचं दिल्लीत कोणीही ऐकणार नाही. ज्या पद्धतीने चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार यांनी ज्या पद्धतीने निधी नेला, तसा आम्ही ही आणू, असे अजित पवारांनी सांगितले.

Ajit Pawar
Abhijeet Patil : फडणवीसांना मोठा धक्का; तुतारीच्या उमेदवारीसाठी अभिजीत पाटलांची राष्ट्रवादीच्या मुलाखतीसाठी हजेरी

सोलापूर विमानतळ सुधारण्याचे काम केले

सोलापूरचे विमानतळ दुर्लक्षित होते. पण, आता त्याच्याही सुधारण्याचे काम सरकारने केले आहे. राज्यात अनेक ठिकाणी विमानतळ आणि रेल्वे स्टेशन सुधारण्याचे काम सरकारने केले आहे. वंदे भारत एक्स्प्रेस, महामार्ग या सरकारच्या काळात झाले आहेत. उजनीच्या पाण्यावर सोलापूरची शेती अवलंबून आहे. आता उजनी शंभर टक्के भरले आहे.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com