Dhanraj Shinde : दोन भाऊ एकत्र; मात्र पुतण्याचा बबनदादा शिंदेंविरोधात बंडाचा झेंडा कायम...

Madha Assembly Constituency : धनराज शिंदे यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू असतानाच माढ्यात मोठी राजकीय घडामोडी घडली. आमदार बबनदादा शिंदे यांनी शिंदे कुटुंबीयांना एकत्रित आणण्यात यश मिळवले आहे.
Babanrao Shinde-Dhanraj Shinde
Babanrao Shinde-Dhanraj ShindeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 08 October : माढ्याच्या राजकारणात धक्क्यावर धक्के बसत आहेत. काका आणि वडील एकत्र आले असले तरी पुतण्याने काकांच्या विरोधात बंडाचा झेंडा कायम ठेवला आहे. होय माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांचे पुतणे धनराज शिंदे यांनी कौटुंबीक ऐक्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारीसाठी पुण्यात मुलाखतीला हजेरी लावली आहे, त्यामुळे माढ्याच्या रणांगणात धनराज शिंदे यांची उमेदवारी कायम असणार असल्याचे यावरून दिसून येत आहे.

आमदार बबनदादा शिंदे (Baban Shinde) यांच्या विरोधात माढा मतदारसंघातून त्यांचे पुतणे धनराज शिंदे यांनी गेल्या काही महिन्यांपासून बंडाचा झेंडा उभारला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची विधानसभा उमेदवारीसाठी त्यांनी दोनदा भेट घेतली आहे. त्यांचे वडील रमेश शिंदे हेही पवारांना भेटले आहेत.

धनराज शिंदे (Dhanraj Shinde) यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू असतानाच माढ्यात (Madha) मोठी राजकीय घडामोडी घडली. आमदार बबनदादा शिंदे यांनी शिंदे कुटुंबीयांना एकत्रित आणण्यात यश मिळवले आहे. आमदार बबनराव शिंदे आणि त्यांचे बंधू रमेश शिंदे हे वैरत्व विसरून एकत्र आले आहेत. एकीकडे माढ्यात बबनदादा शिंदे यांची रणनीती यशस्वी ठरत असताना दुसरीकडे त्यांचे पुतणे मात्र बंडाचा झेंडा कायम ठेवत असल्याचे दिसून येत आहे

Babanrao Shinde-Dhanraj Shinde
Abhijeet Patil : फडणवीसांना मोठा धक्का; तुतारीच्या उमेदवारीसाठी अभिजीत पाटलांची राष्ट्रवादीच्या मुलाखतीसाठी हजेरी

विधानसभा निवडणुकीसाठीच्या इच्छुकांच्या मुलाखती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सध्या पुण्यात घेतल्या जात आहेत. सोलापूर जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती खुद्द शरद पवार घेत आहेत. या मुलाखतीसाठी माढ्यातून धनराज शिंदे यांनीही हजेरी लावली आहे. आता शरद पवार हे उमेदवारी माढ्याची उमेदवारी कोणाला देतात, याकडे सोलापूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे.

एकीकडे बबनदादा शिंदे हे कुटुंबाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करत असताना पुतण्या धनराज शिंदे हे मात्र शरद पवार यांच्या पक्षाच्या मुलाखतीसाठी पुण्यात पोचले आहेत. आता ते निवडणुकीत उतरण्याचा निर्णय शेवटपर्यंत कायम ठेवतात का, हे पाहणे महत्त्वाचे आहे. काका आणि वडिलांच्या दबावानंतर धनराज शिंदे हे माढ्याच्या रणांगणातून माघार घेतात, हेही पाहावे लागणार आहे.

अभिजीत पाटलांनीही लावली हजेरी

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत गेलेले विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी उमेदवारीसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या मुलाखतीला हजेरी लावली आहे. आता पवार अभिजीत पाटील पुन्हा जवळ करणार की निष्ठावंतांना न्याय देणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Babanrao Shinde-Dhanraj Shinde
CM Solapur Tour : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोलापूरला का आले नाहीत?; फडणवीसांनी सांगितले कारण...

या इच्छुकांची मुलाखतीला हजेरी

माढ्यातून उमेदवारी मिळावी, यासाठी धनराज शिंदे, अभिजीत पाटील, माढ्याच्या नगराध्यक्षा मीनल साठे, संजय कोकाटे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मुलाखतीला हजेरी लावली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com