Chandrakant Patil : पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचा मोठा चेहरा भाजप फोडणार? स्वत: चंद्राकांतदादांची खासदाराला ऑफर

Chandrakant Patil On Vishal Patil : सध्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सर्वच पक्ष करत आहेत. याआधी चांगल्या नेत्यांना आपल्याकडे घेण्याची स्पर्धाच सध्या राजकीय पक्षांमध्ये सुरू झाली आहे.
Chandrakant Patil And Vishal Patil
Chandrakant Patil And Vishal Patilsarkarnama
Published on
Updated on

Sangli News : सध्या राज्याच्या राजकारणात आऊट गोईंग आणि इनकमिंगपाहायला मिळत आहे. या आऊट गोईंग आणि इनकमिंगमध्ये शिवसेना ठाकरे गटाला खिंडार पडले आहे. अशातच पुण्यात काँग्रेसला मोठा झटका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. शिवसेनेनं माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनाच फोडत आपल्याबरोबर घेतले. काहीच दिवसांच्याआधी हा पक्ष प्रवेश मुंबईत झाला होता. यामुळे काँग्रेसची पश्चिम महाराष्ट्रात पिच्छे हाट होईल अशी चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेदरम्यान भाजप सांगलीत काँग्रेसला धक्का देण्याची तयारीत आहे. भाजपचे जेष्ठ नेते तथा राज्याचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत गुगली टाकली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटलांना भाजपसोबत येण्याची ऑफर दिली आहे. सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी विशाल पाटलांनी विचार करावा, असेही चंद्रकांत पाटलांनी म्हणत आपली खुली ऑफर असल्याचे म्हटलं आहे. चंद्रकांत पाटलांनी राजकारणामध्ये नेहमी वर्तमानावर चालावं लागतं असा सल्ला देखील विशाल पाटलांना दिला आहे.

यावेळी चंद्रकांत पाटलांनी, विशाल पाटलांकडे अद्याप 4 वर्षे 4 महिने आहेत. त्यामुळे त्यांनी वर्तमानाचा विचार करून आमच्याबरोबर यावं. आमच्याबरोबर आल्यास त्यांना निधी कमी पडणार नाही. सांगलीचा विकास करता येईल, असेही म्हटले आहे.

चंद्राकांत पाटील यांनी टाकलेल्या गुगलीवर आपली विकेट न टाकता विशाल पाटलांनी भाष्य करणं टाळले आहे. तर याबाबत आपण वेगळी पत्रकार परिषद घेऊन बोलू असही स्पष्टीकरण विशाल पाटलांनी दिलं आहे. यामुळे पत्रकार परिषदेत दिलेल्या ऑफरचा आणि विशाल पाटील यावर काय निर्णय घेणार याची सध्या सांगली जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगली आहे.

Chandrakant Patil And Vishal Patil
Chandrakant Patil on Dhangekar : धंगेकरांच्या शिवसेना प्रवेशामुळे भाजपमध्ये नाराजी; चंद्रकांत पाटील म्हणाले, "तर मी त्यांना पक्षात घेण्याविरोधात..."

भाजपचं गणित काय?

लोकसभा निवडणुकीवेळी सांगली लोकसभा मतदार संघाची जागा शिवसेना ठाकरे गटाला गेली होती. त्यामुळे विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. शिवाय ते मतदार संघातून निवडून देखील आले. निवडून आल्यानंतर त्यांना भाजपची ऑफर होती. मात्र वसंतदादा घराण्यातील आणि काँग्रेसची विचारसरणी सरणाऱ्या विशाल पाटील यांनी आपला बिनशर्त पाठिंबा काँग्रेसला दिला. पण त्यांच्यावर कोणाला पाठींबा द्यायचा याचे बंधन नाही. त्यामुळेच भाजप विशाल पाटील यांना आपल्या गळाला लावू पाहत आहे. भाजपला हवे तसे झाल्यास सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढणारच आहे. शिवाय भाजप खासदारांची सख्यांही एकाने वाढू शकते.

Chandrakant Patil And Vishal Patil
Chandrakant Patil : '10 कोटीचा रेडा मी घेतो पण ते...', चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले?

दरम्यान नुकताच काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या एका अशाच ऑफरची राज्यभरात जोरदार चर्चा झाली होती. पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना, मुख्यमंत्री फडणवीस खूप फेकतात आणि खोट बोलतात त्यांनी खोटं बोलू नये असं म्हटले होतं. तर दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे दोघांची हालत खराब झाली आहे. त्यामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसकडे यावं. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पहिल्या खुर्चीवर यायचा आहे. त्यांचं ते स्वप्न आम्ही पूर्ण करू, असा दावा नाना पटोले यांनी केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com