Karad BJP News : चित्रा वाघ यांची विरोधकांवर टीका; म्हणाल्या, महिलांच्या प्रश्नाबाबत त्यांच्याकडून राजकारणच...

Chitra Wagh महिलांवर अत्याचार होत असले तरीही आमचे सरकार तातडीने कारवाई करत असल्याचेही चित्रा वाघ यांनी यावेळी स्पष्ट केले.
BJP Leader Chitra Wagh
BJP Leader Chitra Waghsarkarnama
Published on
Updated on

-हेमंत पवार

Karad BJP News : मणिपूर सारख्या संवेदनशिल मुद्द्यावर सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी अनेकदा विरोधकांना चर्चेचे निमंत्रण दिले. मात्र, चर्चेसाठी कोणी आले नाही. केवळ कांगावा करत राहिले. त्यामुळे त्यांना महिलांच्या कोणत्या प्रश्नांबाबत काही देणेघेणे नाही. भाजपशासित प्रदेशाबद्दल बोलायचे, सरकारला कोंडीत पकडण्याचे काम विरोधी पक्ष करत आहे. पश्चिम बंगाल, राजस्थानच्या घटनेबाबत त्यांना विसर पडतोय. आपली राजकीय पोळी कशी भाजून घेता येईल, हेच त्यांच्याकडून पाहिले जात आहे, अशी टीका भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी विरोधी पक्षांवर केली.

महिलांवर अत्याचार होत असले तरीही आमचे सरकार तातडीने कारवाई करत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. विविध कार्यक्रमासाठी सौ. चित्रा वाघ Chitra Wagh कऱ्हाड Karad दौऱ्यावर होत्या. त्यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. कृष्णा बँकेचे अध्यक्ष अतुल भोसले, शहराध्यक्ष एकनाथ बागडी उपस्थित होते.

चित्रा वाघ म्हणाल्या, मणिपूर भारताचा हिस्सा आहे. मणिपूरमध्ये यापूर्वी कोणतेही पंतप्रधान गेलेले नाहीत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेकदा गेले आहेत. त्या नॉर्थ इस्टला भारताशी कनेक्ट करण्याचे काम मोदी यांनी केले आहे. मणिपूरच्या विषयावर चर्चा करण्यासाठी अनेकदा मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधी पक्षांना पत्र दिले आहे. तरीसुध्दा ते आले नाहीत. त्यांनी केवळ मिडीयावर चर्चा केल्या.

मणिपूरच्या घटनेनंतर पंतप्रधान मोदी यांनी सर्व राज्यांना महिला व मुलींच्या सुरक्षतेचे कायदे अधिक कडक करा, असे निर्देश दिले आहेत. याची लवकरच अंमलबजावणी हाोणार आहे. टीका करणार्‍यांना केवळ टीका करणे हेच काम असते. मोदींना कोंडीत पकडण्याचे काम विरोधी पक्ष करत आहेत.

BJP Leader Chitra Wagh
Satara Political News : शिवेंद्रराजेंचे प्रयत्न; पुणे, मुंबईचे पर्यटक साताऱ्यातून कोकणात उतरणार

खासदार राहुल गांधी यांनी यापूर्वीही डोळे मारणे, मिठ्या मारणे असे प्रकार केले आहेत. चौकीदार चोर आहे, या त्यांच्या वक्तव्याबाबत त्यांना माफी मागावी लागली. मोदी आडनावाबद्दलही त्यांच्या वक्तव्याबाबत बोलल्यानंतर त्यांची खासदारकी गेली. खासदारकी परत मिळाली मात्र, त्यांची वृत्ती गेली नाही. त्यामुळे आम्ही सोनिया गांधी यांना साकडे घातले आहे, की राहुल गांधींचे लग्न करा, म्हणजे ते जागेवर येतील.

खासदार शरद पवार यांच्या भूमिकेबाबत त्या म्हणाल्या, माझ्याकडे महिला संघटन वाढवण्याचे काम भाजप पक्षाने दिले आहे. त्यामुळे मी जरी शरद पवार यांच्यासोबत काम केले असले तरी भाजपासोबत कोण येणार, कोण जाणार याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देवू शकतात. राजकीय निर्णय हे ज्याचे त्यालाच माहित असतात.

Edited By : Umesh Bambare

BJP Leader Chitra Wagh
Sushma Andhare यांची शिंदे - फडणवीसांवर बोचरी टीका | BJP | Shivsena | NCP | Sarkarnama Video

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com