Satara Political News : शिवेंद्रराजेंचे प्रयत्न; पुणे, मुंबईचे पर्यटक साताऱ्यातून कोकणात उतरणार

Bamnoli Cable Stay Bridge सातारा- बामणोली, तापोळा भागात पर्यटन वाढीसाठी महत्वाच्या ठरणाऱ्या बामणोली- दरे आणि आपटी- तापोळा यादरम्यान सी लिंक पद्धतीचे दोन भव्य केबल स्टे ब्रिज उभारण्यात येत आहेत.
Eknath Shinde, Shivendraraje Bhosale
Eknath Shinde, Shivendraraje Bhosalesarkarnama
Published on
Updated on

Satara Political News : बामणोली, तापोळा भागात पर्यटन वाढीसाठी महत्वाच्या ठरणाऱ्या बामणोली- दरे आणि आपटी- तापोळा यादरम्यान सी लिंक पद्धतीचे दोन भव्य केबल स्टे ब्रिज उभारण्यात येत आहेत. महामार्गावरून आणि मुंबई, पुण्यावरून येणारे पर्यटक पाचवड मार्गे थेट या भागात येऊन कोकणात जाऊ शकणार आहेत. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नांमुळे या पुलांची उभारणी होत असून बामणोली भागातील पर्यटनवाढीला चालना मिळणार आहे.

आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या MLA Shivendraraje Bhosale मागणीवरून आणि पाठपुराव्यातून बामणोली Bamnoli परिसरात हे दोन पूल मंजूर झालेले आहेत. ३०० कोटी खर्चाचा बामणोली ते दरे जोडणारा ७२० मीटरचा केबल स्टे ब्रिज होणार आहे. बामणोली बाजूला १५० मीटर तर, दरे बाजूला ४५० मीटर पोहोच मार्ग होणार आहेत. याचा लाभ आसपासच्या सर्वच गावांना होणार आहे.

याच मार्गाला महामार्गावरून पाचवड हॅम रस्ता दरे येथे जोडला जाणार आहे. त्यामुळे महामार्ग आणि पुणे, मुंबईवरून येणाऱ्या पर्यटकांना कराड वरून कोकणात जाण्याऐवजी बामणोली- दरे पुलामार्गे थेट कोकणात उतरता येणार आहे. यामुळे सहाजिकच बामणोली भागातील पर्यटन वाढणार आहे. याशिवाय पर्यटकांचा वेळ आणि इंधन बचत होणार आहे.

१५० कोटी निधीतून आपटी ते तापोळा असा ५६० मीटरचा केबल स्टे ब्रिज उभा राहणार आहे. आपटी बाजूस २०० मीटर तर, तापोळा बाजूस ३०० मीटर पोहोच रस्ते प्रस्तावित आहेत. हा पूल झाल्यानंतर आपटी, वाकी, तेटली, बामणोली आदी गावांना फायदा होणार असून २५ किलोमीटर अंतराचा प्रवास वाचणार आहे.

Eknath Shinde, Shivendraraje Bhosale
Satara CM News : मुख्यमंत्र्यांची जिल्हाधिकाऱ्यांना सूचना; महाबळेश्वर, कासला अनाधिकृत बांधकामे नकोत...

या दोन्ही पुलांची कामे तातडीने मार्गी लावण्यासंदर्भाने शिवेंद्रसिंहराजेंनी आढावा बैठक घेतली. यावेळी जावली सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता डी. एस. पवार, शाखा अभियंता निलेश कोहाळे, महेश कुन्हाळीकर, सेवा सल्लागार कंपनी टी. पी. एफ. कन्सल्टन्सीचे अधिकारी, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्यासह बामणोली भागातील सर्वच गावातील पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

तातडीने शासकीय सोपस्कार पूर्ण करून दोन्ही पुलांचे काम सुरु करा अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजेंनी अधिकाऱ्यांना केल्या. दरम्यान, या दोन्ही पुलांच्या उभारणीमुळे या भागातील पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढेल आणि या भागातील रोजगार आणि व्यापार वृद्धी होईल. पर्यटकांनाही बामणोलीतून थेट कोकणात उतरता येणार आहे. महाबळेश्वर ते बामणोली असाही प्रवास कमी वेळेत करता येणार असल्याने या दोन्ही पुलांचा फायदा स्थानिकांसह पर्यटकांना होईल, असेही शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.

Edited By : Umesh Bambare

Eknath Shinde, Shivendraraje Bhosale
BJP Health Camp : `देवेंद्र सप्ताह` अंतर्गत आरोग्य शिबिरात सव्वादोन लाख घरात तपासणी..

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com