Solapur Bazar Samiti : माझ्या मुलाला मतदान केंद्रातून बाहेर काढतो का?; काँग्रेस अन्‌ भाजप नेत्यांमध्ये बाचाबाची, एकमेकांच्या अंगावर धावून गेले (Video)

Solapur Political Clash News : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध भाजप अशी लढत होत आहे. त्यामुळे दोन्ही पॅनेलची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
Suresh Hasapure-Appasaheb Patil
Suresh Hasapure-Appasaheb PatilSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 27 April : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आज (ता. 27 मार्च) मतदान होत आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबर्गी मतदान केंद्रावर किरकोळ कारणावरून काँग्रेस नेते तथा बाजार समितीचे माजी संचालक सुरेश हसापुरे आणि भाजपचे नेते तथा माजी संचालक आप्पासाहेब पाटील यांच्यामध्ये शाब्दीक बाचाबाची, हमरीतुमरी झाली. हे दोन्ही नेते एकमेकांच्या अंगावर धावून गेले, त्यामुळे मतदान केंद्रावर काही काळ तणाव निर्माण झाला होता. शेवटी पाेलिस आणि इतर नेत्यांनी हस्तक्षेप करत हा वाद मिटविला.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी (Solapur Bazar Samiti) आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार दिलीप माने, काँग्रेसचे सुरेश हसापुरे यांच्या श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनेल विरुद्ध आमदार सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, बळीराम साठे यांच्या श्री सिद्धेश्वर परिवर्तन पॅनेलमध्ये लढत होत आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध भाजप अशी लढत होत आहे. त्यामुळे दोन्ही पॅनेलची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

सुरेश हसापुरे (Suresh Hasapure) हे श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनेलमधून सोसायटी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत, तर वडकबाळचे आप्पासाहेब पाटील हे सुभाष देशमुख यांच्या पॅनेलमधून निवडणूक लढवत आहेत. आप्पासाहेब पाटील हे मतदानासाठी केंद्रावर गेले होते. मतदान केल्यानंतर त्यांनी पोलिंग एजंट सोडून बाकीच्या लोकांना मतदान केंद्रातून बाहेर काढण्यात यावे, अशी मागणी केली.

Suresh Hasapure-Appasaheb Patil
Solapur Bazar Samiti : सोलापूर बाजार समिती निवडणुकीत मताचा ‘हा’ आकडा फुटला; क्रॉस वोटिंग होणार, दोन्हींकडून जोरदार मोर्चेबांधणी

आप्पासाहेब पाटील यांनी तसे म्हणताच सुरेश हसापुरे यांचा मुलगा मतदान केंद्रातून बाहेर आला. त्यावेळी बाहेर उभे असलेले सुरेश हसापुरे यांना राग अनावर झाला. त्यातून त्यांनी आप्पासाहेब पाटील यांना ‘माझ्या मुलाला मतदान केंद्रातून बाहेर काढतो का?’, अशी एकेरीत विचारणा केली. त्यामुळे चिडलेल्या आप्पासाहेब पाटील यांनीही प्रत्युत्तर दिले, त्यामुळे दोघांमध्ये वाद वाढत गेला. प्रकरण एकेरी भांडणावर गेले.

हसापुरे आणि आप्पासाहेब पाटील यांनी एकमेकांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे बाचाबाची झाली. दोघेही हमरीतुमरीवर आले हेाते. दोन्ही नेते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. त्यामुळे मतदान केंद्रावर वातावरण गरम झाले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने हा वाद मिटला. तसेच, स्थानिक नेत्यांनीही दोघांना बाजूला घेतले, त्यामुळे दोन माजी संचालकांच्या वादावर पडदा पडला.

Suresh Hasapure-Appasaheb Patil
Dr. Shirish Valsangkar : ‘डॉ. वळसंगकरांची हॉस्पिटमधील ये-जा वाढली अन्‌ वेगवेगळे राहणारे सून आणि मुलगा एकत्र आले’; मनीषा माने हिने सांगितली नेमकी गोष्टी

दरम्यान, बाजार समितीच्या निवडणुकीमुळे सोलापूर जिल्ह्यातील मातब्बर नेते मंडळींची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विशेषतः भाजपचे माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, दिलीप माने, बळीराम साठे यांनीही ताकद पणाला लावली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com