Dr. Shirish Valsangkar : ‘डॉ. वळसंगकरांची हॉस्पिटमधील ये-जा वाढली अन्‌ वेगवेगळे राहणारे सून आणि मुलगा एकत्र आले’; मनीषा माने हिने सांगितली नेमकी गोष्टी

Dr. Shirish Valsangkar Suicide Case : डॉ. शिरीष वळसंगकर यांनी हॉस्पिटलची उभारणी करून ते नावारूपाला आणले होते. त्याच डॉ. वळसंगकर यांना स्वकीयांकडून अपमानास्पद वागणूक दिली जात होती. जवळची व्यक्ती त्यांच्या अंगावर तीनवेळा धावून गेली हेाती.
Dr. Shirish Valsangkar
Dr. Shirish ValsangkarSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 26 April : डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेली वळसंगकर हॉस्पिटलची प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने हिने चौकशीत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. डॉ वळसंगकरांच्या हाती हॉस्पिटलमधील फक्त ओपीडीचे अधिकार ठेवण्यात आले होते. सर्व व्यवहार हा मुलगा आणि सुनेच्या हाती होता. मात्र, सून आणि मुलामधील वादाचा फटका रुग्णालयाला बसू नये म्हणून अलीकडे डॉ. वळसंगकर यांची हॉस्टिलमध्ये ये-जा वाढली होती. पण, डॉक्टरांचा हस्तक्षेप दोघांनाही मान्य नव्हता, त्यामुळेच काही महिने वेगवेगळे राहिलेले डॉ अश्विन आणि डॉ शोनाली हे एकत्र आले होते, असे मनीषाने म्हटल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी वळसंगकर हॉस्पिटलची सुरुवात केली होती, त्यांनीच रुग्णालयाची उभारणी करून ते नावारूपाला आणले होते. त्याच डॉ. शिरीष वळसंगकर यांना स्वकीयांकडून अपमानास्पद वागणूक दिली जात होती. जवळची व्यक्ती त्यांच्या अंगावर तीनवेळा धावून गेली हेाती. त्यामुळे डॉक्टरांच्या हाती हॉस्पिटमधील अधिकार नाममात्रच होते. हॉस्पिटलमध्ये त्यांच्या शब्दाला शून्य किंमत हेाती. बिल कमी करण्याचेही अधिकार त्यांची हाती नव्हते, त्यामुळे त्यांनीच उभारलेल्या हॉस्पिटलमध्ये डॉ वळसंगकर यांची कोंडी केली जात होती, असे मनीषा मुसळे माने हिने चौकशीत नमूद केल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

डॉ. वळसंगकर यांची सून शोनाली वळसंगकर ह्या न्यूरो सर्जन होत्या, त्यामुळे त्यांच्याकडे रुग्णांची संख्या अधिक असायची. त्यांचा मुलगा डॉ. अश्विन वळसंगकर यांचेही स्वतंत्र रुग्ण असायचे, त्यामुळे त्यांच्याकडे आलेल्या रुग्णाचे बिल ते ते घ्यायचे. माझ्याकडे रुग्णालयातील केवळ वेल्फेअरचे काम होते. हॉस्पिटलला (Valsangkar Hospital) लागणाऱ्या वस्तू डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या सहीने मी त्या मागवत हेाते. वळसंगकर हॉस्पिटलमधील तब्बल ५० टक्के अधिकार देऊनही सून शोनाली ह्यांना डॉ. शिरीष वळसंगकर यांचा हस्तक्षेप मान्य नव्हता, असेही मनीषाने पोलिस चौकशीत सांगितल्याचे समोर आले आहे.

Dr. Shirish Valsangkar
Dr. Shirish Valsangkar : डॉ. वळसंगकरांच्या सुनेच्या नावे प्रॉपर्टीतील 50 टक्के शेअर्स; पण चौकशीत ‘ही’ महत्वपूर्ण बाब आली समोर...

डॉ. शोनाली ह्या घटस्फोट घेण्याच्या मानसिकतेत होत्या, त्यामुळे सून शोनाली आणि मुलगा डॉ अश्विन यांच्यात वाद होते. त्या वादाचा रुग्णालयावर परिणाम होऊ नये म्हणून डॉ. शिरीष वळसंगकर यांनी हॉस्पिटलमध्ये लक्ष घालण्यास सुरुवात केली होती. मात्र, ते मुलगा आणि सून दोघांनाही आवडत नव्हते. त्यातूनच वेगवेगळे राहणारे सून आणि मुलगा पुन्हा एकत्र आले होते.

मनीषा मुसळे माने हिने पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत अनेक गोष्टींचा उलगडा केलेला आहे. मात्र, डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप पुढे आलेले नाही. आता डॉक्टरांच्या सीडीआरमधूनच धागेदोरे हाती लागतील, अशी पोलिसांनी अपेक्षा आहे.

सुसाईड नोटाबाबत संशय

डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या खिशात सापडलेली चिठ्ठी नेमकी कोणी लिहिलेली आहे. त्याच्या पडताळणीसाठी पोलिसांनी गुरुवारी (ता. २४ एप्रिल) रुग्णालयातून डॉ. वळसंगकर यांचे हस्ताक्षर व स्वाक्षरी असलेली काही कागदपत्रे जप्त केली आहेत. ही कागदपत्रे पडताळणीसाठी हस्ताक्षर तज्ज्ञांकडे पाठविण्यात आली आहेत. त्याचा अहवाल पुढील आठवड्यात मिळणार आहे, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

Dr. Shirish Valsangkar
Dr. Shirish Valsangkar : अवघ्या दोन मिनिटांत संपवली सुनावणी; पोलिसांनी स्वतःहून मागितली मनीषा मुसळे-मानेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

डॉ वळसंगकरांच्या फोन कॉल्सची चौकशी होणार

डॉ. शिरीष वळसंगकर यांनी १ ते १७ एप्रिल या काळात कोणाकोणाला फोन केले, त्यांना कोणाचे फोन आले. डॉक्टरांना कोण कोण भेटले, याची माहिती पोलिसांनी घेतली आहे. तसचे मनीषा मुसळे माने हिने डॉक्टरांना महिनाभरात किती कॉल केले. तसेच, तिने इतर कोणाला फोन केले आहेत, याचीही माहिती पोलिसांनी जमा केली आहे. डॉक्टरांचे घर आणि दवाखान्यातील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com