Devendra Fadnavis News : लोकसभा, विधानसभा निवडणुकीमध्ये इचलकरंजीकरांना महायुती सरकारने पिण्याच्या पाण्याचे आश्वासन दिले होते. आता पुन्हा एकदा इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय देवा भाऊ शांत बसणार नाही, असा शब्द दिला आहे. ते आज इचलकरंजी मध्ये शंभू तीर्थ येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, आज मला अतिशय आनंद आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्याची संधी मिळाली. आजचा दिवस माझ्या करीत पुण्य दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराज दर्शन घेतलं त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज आणि सांगलीत जाऊन अहिल्यादेवी यांच्या पुतळ्याचे अनावरण होतंय. पुण्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मार्गाचे उद्घाटन करायचे आहे. त्यामुळे आजचा दिवस छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना समर्पित करतो.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, एकीकडे शिवाजी महाराज आणि दुसरीकडे संभाजी महाराज यांचे पुतळे आपल्याला प्रेरणा देत राहतील.महाराज नसते तर हा भगवा दिसला नसता. पण काहीनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास स्वातंत्र्यानंतर देखील दाबण्याचा प्रयत्न केला. मुघलांच्या इतिहासाला सतरा पानं होते आणि माझ्या राजाच्या इतिहासाला एक पॅरेग्राफ दिला होता. यात पंतप्रधान मोदी यांनी बदल केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला 21 पाने दिली. त्यामुळे आपल्या मुलांना आता छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकायला मिळतो.
'औरंगजेबाला वाटले छत्रपती शिवाजी महाराज नाही त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र ताब्यात घेता घेईल. पण त्याला माहिती नव्हतं एक छावा या ठिकाणी उभा होता. त्याने एक ही लढाई हरलेली नाही. दगा झाला नसता तर या छाव्याला पकडण्याची कुणाची हिंमत झाली नसती. वयाच्या 14 व्या वर्षी संस्कृत ग्रंथ लिहिला. जर संभाजी महाराजांच्या बद्दल दगाफटका झाला नसता तर या देशाचा इतिहास वेगळा असता. मात्र त्यानंतर देखील मराठ्यांनी मोगली साम्राज्य नष्ट करून मराठ्यांचे साम्राज्य तेवत ठेवलं'. असे फडणवीस म्हणाले.
आपल्याला देखील जातीपाती तोडून एक राहावं लागेल. आपला भगवा शाबूत ठेवावा लागेल, आपलं हिंदुत्व शाबूत ठेवावे लागेल. आपला हिंदुस्तान हिंदुस्तानच राहिला पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.