Jayant Patil-Vishal Patil Alliance : धोका ओळखला! कट्टर विरोधक एकत्र; जयंत पाटील-विशाल पाटलांकडून युतीची घोषणा, विश्वजित कदमही उपस्थित

Congress–NCP SP Alliance Sangli : एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले जयंत पाटील आणि विशाल पाटील हे प्रथमच एकत्र आले आहेत. सांगली महापालिकेसाठी एकत्र येत त्यांनी पत्रकार परिषद घेतली.
Vishal Patil, Vishwajeet Kadam, Jayant Patil struggles
Vishal Patil, Vishwajeet Kadam, Jayant Patil Sarkarnama
Published on
Updated on

Sangli Politics : आगामी महापालिका निवडणुकीसाठी कट्टर विरोधक एकत्र येताना दिसत आहेत. विशाल पाटील आणि जयंत पाटील यांच्यातील विरोध हा सर्व सांगली जिल्ह्याला परिचित आहे. मात्र, आगामी महापालिका निवडणुकीत वेगळे लढलो तर त्याचा फायदा भाजपला होईल, हे उघड सत्य असताना हे कट्टर विरोधक एकत्र आले आहेत.

आमदार जयंत पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत सांगली महापालिकेसाठी युती करणार असल्याची घोषणा केली. जयंत पाटील म्हणाले की, पुढील दोन तीन दिवसांत जागा वाटप निश्चित केले जाईल.

जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, विशाल पाटील हे अपक्ष खासदार असले तरी त्यांचा डीएनए हा काँग्रेसचा आहे. सांगली महापालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे. आमची जागा वाटपावर चर्चा झाली, पण मुर्त स्वरूप आले नाही. जागा वाटपाची घोषणा लवकरच करणार आहोत.

Vishal Patil, Vishwajeet Kadam, Jayant Patil struggles
municipal elections : निवडणूक जाहीर होण्याच्या आधीच ठाकरेंच्या रणरागिणीचे गंभीर आरोप, म्हणाल्या, मतदार याद्या...

अखेर आघाडी झाली

नगरपालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका आणि महायुती मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका एक राहिली आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला ही भूमिका पटलेली नव्हती. त्यामुळे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची राष्ट्रवादीशी जुळवून घेण्याची मानसिकता आहे की नाही यावर प्रश्न उपस्थित केले जात होते. अखेर जयंत पाटील यांनीच आघाडीची घोषणा करून महाविकास आघाडीचा मार्ग मोकळा केला आहे.

Vishal Patil, Vishwajeet Kadam, Jayant Patil struggles
MVA Congress-MNS Alliance : 'मनसे'ची महाविकास आघाडीत एन्ट्री निश्चित, काँग्रेसने दाखवला हिरवा कंदील; ठाकरे, पवारांचे शिलेदारही आग्रही!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com